दहशतवादी नाचनची पिलावळ ठेचायला हवी!
देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबई शहराच्या शेजारी दुसरा सिरीया तयार करण्याचा उद्योग तपास यंत्रणांनी हाणून पाडला. तीन वेळा अटक होऊन देखील धर्मांधतेची पट्टी बांधलेल्या साकिब नाचनच्या देशविघातक कारवाया थांबायच्या नाव घेईनात. सध्या गाजाआड असताना देखील त्याने पाळलेल्या पिलावळीला पडघा गावात सक्रीय केले आहे. सध्या हीच वेळ आहे नाचनसहीत त्याच्या पिलावळीच्या नांग्या ठेचण्याची.
जगातील औद्योगिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबई शहराच्या शेजारी दुसरा सीरीया देश निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रयत्न सुऊ असतानाच एनआयएने याचा पर्दाफाश करीत असा प्रयत्न करणाऱ्या साकिब नाचन या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या. याचे सर्व श्रेय हे तत्कालीन एनआयएचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांना जाते. त्यांनी साकिब नाचनला तर अटक केली, मात्र साकिबची पिलावळ अद्याप मागे जिवंत असल्याने, त्यांच्यावर देखील करडी नजर ठेवण्यास सुऊवात केली.
अशातच पुन्हा एकदा भिवंडीतील पडघा गावात सीरीयासारखे वारे वाहण्यास सुऊवात झाल्याची भणक राज्य एटीएसला लागताच त्यांनी तत्काळ छापा टाकत अनेकांना अटक केली. यावेळी एटीएसने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक माहितींचा खुलासा झाला आहे. पडघा हे गाव पूर्ण स्वतंत्र असून, या गावात 15 जणांचे कॅबिनेट मंत्रीमंडळ देखील स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर आली. तेही अगदी मुंबईच्या शेजारी हा उद्योग सुऊ असल्याने, याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
आत्तापर्यंत या उपदव्यापाचा कर्ताधर्ता असलेल्या साकिब नाचनला तीन वेळा अटक केली आहे. मात्र त्याने पेरलेले दहशतवादी विचार अद्याप जिवंत आहेत. यामुळेच नाचनच्या पिलावळीची एवढी मोठी हिम्मत होत आहे. या सर्वांना वेळीच आळा घालायचा असेल तर प्रथम नाचनने सोकावलेल्या पिलावळीला प्रथम ठेचून काढले पाहिजे. हा भारत देश आहे. या देशात गद्दारांना थारा नाही हे दाखविण्याची हीच योग्य वेळ आहे.
मुंबई शेजारी सिरीयासारखे आयएसचा अंमल असलेले गाव असावे. या गावात केवळ आपलीच हुकुमत असावी. हे स्वप्न पाहत असलेल्या नाचनने आयएस या दहशतवादी संघटनेचा आश्रय घेण्यास सुऊवात केली होती. यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात आयएसमध्ये तरूणांचे ब्रेन वॉश करत भरती करण्याचा सपाटा सुऊ केला होता. साकिब नाचन हा पडघ्यातील बोरीवली गावात राहतो. त्याला आतापर्यंत तीन वेळा अटक झाली आहे. 1990च्या दशकात बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. खलिस्तानी दहशतवाद्याबरोबर तेव्हा नाचनला अटक झाली होती.
गुजरातमधील ‘टाडा’ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. परंतु पाच वर्षे तुऊंगात राहिल्यावर नाचनची सुटका झाली. त्यानंतर नाचनला 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाली होती. तो ठाणे कारागफहात होता. नाचन याची वर्तणूक चांगली असल्याची बाब लक्षात घेऊन कारागफह प्रशासनाने त्याची पाच महिने 13 दिवस आधीच सुटका केली होती. ठाणे कारागफहातून बाहेर पडताच, त्याला भेटण्यासाठी पडघ्यातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते तऊणांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती.
एक प्रकारे नाचन पडघा गावासाठी नायक ठरला आहे. पडघ्यातील बोरीवली गावापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर पडघा पोलीस ठाणे आहे. गावात पोलीस चौकीदेखील आहे. मार्च 2003 मध्ये प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे यांचे विशेष पथक साकिब नाचन याला अटक करण्यासाठी गेले होते. साकिबला पोलीस घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर काही ग्रामस्थ साकिबच्या घराजवळ दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या पथकाला साकिबला नेण्यापासून विरोध केला. साकिबला पोलिसांच्या वाहनामध्ये बसविल्यानंतर पथकावर हल्ला झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी साकिबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पालीस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. हे तीनही वरिष्ठ पोलीस अधिकारी एनकाउन्टर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात.
साकिब याचा काका या भागातून ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर निवडून येत असे. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले होते. नाचन याने ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा सरचिटणीस म्हणून काम केले होते. त्याचे बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक होण्यापूर्वी त्याने पडघ्यातील डोंगराळ भागात काही तऊणांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देखील दिले आहे. मुलुंड बॉम्बस्फोट खटल्यात जामिनावर असताना भिवंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अॅड. मोहन रायचनी यांच्या हत्येतही नाचन याच्यावर आरोप होते. नाचन याचा पडघा गावात हळूहळू दबदबा वाढत होता. गावातील काही समस्या असल्यास येथील रहिवाशी पोलिसांऐवजी साकिबकडे जाऊ लागले. त्यातून साकिबचा ‘साकिब भाई’ झाला. गावात बहुतांश नागरिक त्याचा ‘साकिब भाई’ म्हणून उल्लेख करतात.
साकिब नाचन याने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केले होते. अल-शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सीरिया त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता. साकिबने पडघा गावाला अल-शाम असे नाव दिले होते. पडघ्यातला तळ मजबूत करण्यासाठी तो मुस्लिम तऊणांना पडघ्यात स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता. देशात विघातक कारवाया करणे, सामाजिक सलोखा भंग करणे आणि भारत सरकारविरोधात लढा पुकारणे अशी योजना या मॉड्यूलच्या माध्यमातून होत होती. यापूर्वी पडघा गावातून एनआयएने ऑगस्ट महिन्यात साकिब आणि त्याच्या मुलाला अटक केली होती.
तेंव्हापासून तो तुरुंगात आहे. साकिब तुरुं गात असला तरी त्याची पिलावळ पडघ्यामध्ये सक्रिय आहे. हे एटीएसने नुकतेच टाकलेल्या छाप्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच साकिब नाचनच्या घरासह तीस ते पस्तीस घरांवर एटीएसनं छापे टाकले. या झडतीदरम्यान त्याच्या घरातून मोबाइल, तलवार, सुरा, मालमत्तेची संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. या गावात कुणाचाही मफत्यू झाल्यावर कब्रस्तानात दफन केले जाते मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीतून परवानगी घेतली जात नाही. या बोरीवली पडघा परिसरात गोवंश विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते, यामागे नाचन आणि त्याच्याच पिलावळीचा हात आहे. यामुळे हीच योग्य वेळ आहे नाचनच्या पिलावळीला ठेचण्याची.
- अमोल राऊत