For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पारो पिनाकी की कहानी’चा टीझर सादर

06:10 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पारो पिनाकी की कहानी’चा टीझर सादर
Advertisement

पाहता येणार अनोखी प्रेमकथा

Advertisement

एक सफाई कर्मचारी आणि भाजी विक्रेत्यामधील प्रेमकथा दाखविणारा चित्रपट ‘पारो पिनाकी की कहानी’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, प्रेम, भावना आणि ट्विस्टने भरपूर या टीझरला पाहिल्यावर लोकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

पिनाकी एक मॅनहोल सफाई कर्मचारी असून भाजी विक्रेती मरियमवर प्रेम करत असतो. दोघेही एका छोट्या गावातील असले तरीही कामासाठी शहरात ये-जा करत असतात. रेल्वेत दररोजच्या भेटींदरम्यान ते प्रेमात पडतात. एक दिवस मरियम येत नाही, मग पिनाकी चिंतेत पडून हताश होतो. तिला शोधण्यासाठी पिनाकी एका धोकादायक प्रवासावर बाहेर पडतो. यादरम्यान कोणती रहस्यं समोर येतात आणि त्यांना तो कसा सामोरा जातो हे चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे.

Advertisement

याच्या टीझरमध्ये प्रेम, रोमान्स, इमोशन, ट्रॅजेडी आणि सामाजिक मुद्द्यावर प्रहाररही दिसून येतो. टीझरमध्ये युवतींना बळजबरीने उचलून त्यांच्याशी विवाह करण्याची समस्याही दाखविण्यात आली आहे.

रुद्र जादौनकडून दिग्दर्शित ‘पारो पिनाकी की कहानी’मध्ये इशिता सिंह आणि संजय बिश्नोई प्रमुख भूमिकेत दिसून येतील. याचबरोबर धनंजय सरदेशपांडे, हनुमान सोनी, प्रेरणा मोहोड, मदन देवधर, संजय ढोले, हेमंत कदम आणि योगेश सुधाकर कुलकर्णी हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.