चालकांचा जीव वाचविणारा टॅटू
त्वरित ओळखणार मेंदूचा थकवा
माणसाचा मेंदू थकतो, तो अमर्यादित काळासाठी काम करू शकत नाही. परंतु काम करताना मेंदू कधी थकतो हे कसे ओळखणार? हे जाणण्यासाठी काही जुनी तंत्रज्ञानं आहेत, परंतु ती फारशी उपयुक्त नाहीत. आता अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक नवे तंत्रज्ञान निर्माण केले आहे. हा इलेक्ट्रॉनिक चेहरा टॅटू असून तो माथ्यावर लावला जातो. हा टॅटू थकव्याचे मोजमाप करतो. ट्रकचालक आणि अन्य कर्मचाऱ्यांना हा टॅटू मदत करू शकतो. हा टॅटू अस्थायी असून तो वायरलेस आहे. तसेच याला हेडगियरची गरज नाही. हा मेंदूच्या विद्युत हालचालींचे मापन करत त्वरित निष्कर्ष देतो. याला इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी (ईईजी) आणि इलेक्ट्रोओकुलोग्राफी (ईओजी) म्हटले जाते. तसेच हा डोळ्यांच्या वेगालाही ट्रॅक करतो.
खास स्थितीत काम करण्याची गरज
टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक नान्शु लू यांनी या अध्ययनाचे नेतृत्व केले. तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होत आहे. आमचा मेंदू याला साथ देऊ शकत नाही, तो सहजपणे थकून जातो. माणूस संतुलित मानसिक स्थितीत चांगले काम करतो, त्याला ‘गोल्डीलॉक्स झोन’ म्हणतात, यात अधिक तणाव नसतो, तसेच कंटाळवाणेही नसते, हे संतुलन प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असते असे त्यांनी सांगितले.
पूर्वीची तंत्रज्ञानं
पूर्वी मानसिक थकव्याचे मोजमाप करण्यासाठी नासा टास्क लोड इंडेक्सचा वापर व्हायचा. हे एक दीर्घ सर्वेक्षण आहे. लोक याची माहिती कामानंतर भरत असतात. इलेक्ट्रॉनिक टॅटू याला सोपे करतो. हा टॅटू हलका असून यात स्टिकरसारखे सेंसर आहेत. यात ‘लहरदार’ लूप आणि कॉइल आहे. हा त्वचेवर आरामात चिकटतो.
मानसिक थकव्याचे संकेत
पारंपरिक ईईजी कॅप योग्य सिग्नल देऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचे डोके वेगळे असते, आमच्या चेहऱ्याची रचना पाहून टॅटूला वैयक्तिक तयार करता येते. संशोधकांनी 6 जणांवर याचे परीक्षण केले. त्यांना एक मेमरी टास्क देण्यात आली. टास्कची काठिण्यपातळी वाढविण्यात आली. जसजसा मानसिक भार वाढला, थीटा आणि डेल्टा ब्रेनवेव्स वाढले. हा मेंदूवर अधिक दबाव दाखवतो. अल्फा आणि बीटा ब्रेनवेव्स कमी होणे मानसिक थकव्याचा संकेत असतो.