For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटीटीवर येणार ‘द टाटाज’

06:46 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओटीटीवर येणार ‘द टाटाज’
Advertisement

वेबसीरिजमध्ये दिसणार 100 वर्षांचा इतिहास

Advertisement

अलिकडेच ओटीटीवर ‘ए टायटन स्टोरी’ या वेबसीरिजने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळविली होती. आता ए टायटन स्टोरीच्या निर्मात्यांनी भारतातील प्रसिद्ध औद्योगिक समूह टाटांच्या पार्श्वभूमीला दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याकरता त्यांनी ‘द टाटाज’ नावाच्या वेबसीरिजवर काम सुरू केले आहे. टी-सीरिज आणि ऑल मायटी मोशन पिक्चर्सकडून आता ‘द टाटाज’ची तयारी केली जात आहे.

द टाटाजमध्ये टाटा घराच्या 100 वर्षांच्या  इतिहासाला दर्शविण्यात येणार आहे, ज्यात पिढ्यानपिढ्या टाटा परिवाराच्या लोकांनी उद्योगक्षेत्रात महत्त्वाचे योगदान कशाप्रकारे दिले आणि स्वत:च्या उद्योगांच्या बळावर भारताचे नाव कसे उज्ज्वल केले हे दाखविण्यात येणार आहे.

Advertisement

ही वेबसीरिज एका पुस्तकावर आधारित असणार आहे. याच्या आधारावर दिग्गज उद्योजक रतन  टाटा यांच्या परिवाराची कहाणी दर्शविण्यात येणार आहे. निर्मात्यांनी या सीरिजकरता अमेझॉन एमएक्स प्लेयरसोबत कार केला आहे. याच आधारार द टाटाज वेबसीरिज आगामी काळात याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाणार आहे. परंतु ही वेबसीरिज कधीच प्रदर्शित होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement
Tags :

.