कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पंचायत’चा तमिळ रिमेक प्रदर्शनाच्या वाटेवर

06:50 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंचायत ही हिंदीतील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. प्राइम व्हिडिओने  स्वत:ची आगामी तमिळ ओरिजिनल सीरिज ‘थलाइवेटियन पलायम’च्या प्रीमियरची तारीख घोषित केली आहे. मर्मदेसम आणि  रामानी बनाम रामानी फेम नागाकडून दिग्दर्शित ही सीरिज ‘पंचायत’चा तमिळ रिमेक आहे. याची तमिळमधील कथा बालाकुमारन मुरुगेसन यांनी लिहिली आहे. ही तमिळ सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement

थलाइवेटियन पलायममध्ये स्टँडअप कॉमेडियन अभिषेक कुमार मुख्य भूमिकेत आहे. तर चेतन आणि देवदर्शिनी यासारखे अन्य कलाकारही दिसून येणार आहेत. या सीरिजमध्ये केवळ दक्षिणेतील कलाकार दिसून येणार आहेत. सोशल मीडियारव निर्मात्यांनी नव्या शोचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये मुख्य कलाकार वाळवंटात पोझ देताना दिसून येतो, त्याचा लुक रंजक असण्यासोबत रहस्यमय देखील वाटत आहे.

थलाइवेटियन पलायम या सीरिजचा प्रीमियर प्राइम व्हिडिओवर 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही सीरिज तमिळ भाषेत असून इंग्रजीत याचे सबटायइटल असणार आहेत. यात अभिषेक कुमार, चेतन कदंबी, देवदर्शिनी नियति, आनंद सामी आणि पॉल राज हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article