महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संभाव्य पुराच्या सामन्यासाठी यंत्रणा सज्ज

11:06 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची ग्वाही : बोटींची संख्या वाढविण्याचीही तयारी

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटकातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुराचा फटका बसणाऱ्या गावांचे स्थलांतर करण्यासाठीही तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. गुरुवारी पालकमंत्र्यांनी रायबाग तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जमखंडी-मिरज राज्य महामार्गावरील कुडचीचा पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरील पाण्याचीही त्यांनी माहिती घेतली. जुने दिग्गेवाडीला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.

Advertisement

कुडची येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणातून 3 लाख क्युसेक पाणी सोडल्यानंतर पुराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनावर सतत लक्ष ठेवले आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. बचावासाठी पथके, काळजी केंद्रे सज्ज ठेवली आहेत. पाऊस अधिक असल्यामुळे धरणातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता आहे. आवश्यक ठिकाणी काळजी केंद्रे सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. काही ठिकाणी लोक काळजी केंद्रावर येण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नकार देत आहेत. त्यांची मनधरणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे घर गमावणाऱ्या कुटुंबाला घर बांधकामासाठी राज्य सरकारकडून 3 लाख रुपये देण्याचा विचार सुरू आहे. याबरोबरच केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून देण्यात येणार आहे. पाच लाख रुपये भरपाई जाहीर केल्यानंतर ते संबंधितांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले नाही. त्यामुळेच मदतीचा आकडा कमी असला तरी तो सर्वांना वेळेत पोहोचावा, हा सरकारचा उद्देश आहे, असेही जारकीहोळी यांनी सांगितले. याचवेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी खानापुरात एनडीआरएफचे पथक तयार ठेवण्यात आल्याचे सांगितले. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी यावेळी उपस्थित होते.

अतिरिक्त बोटींची गरज भासल्यास कारवारहून मागवणार

जिल्ह्यात सध्या 35 बोटी उपलब्ध आहेत. अतिरिक्त बोटींची गरज भासल्यास कारवारहून मागवण्यात येतील. सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. महाराष्ट्रात तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून परस्पर माहितीचे आदानप्रदान करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article