महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बालिकेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला कलाटणी

12:21 PM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल : आतड्यांना धक्का पोहोचल्याचे अहवालावरून स्पष्ट 

Advertisement

बेळगाव : चार महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झालेल्या मार्कंडेयनगर, कंग्राळी खुर्द येथील बालिकेच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. शवचिकित्सा अहवालानंतर मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी न्हावी (वय 4, मूळची रा. परकनट्टी, ता. हुक्केरी सध्या रा. मार्कंडेयनगर) असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी उलट्या सुरू झाल्यामुळे तिला खासगी दवाखान्यात दाखविण्यात आले होते. रविवार दि. 19 मे रोजी प्रकृती खालावल्याने सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना तिचा मृत्यू झाला होता.

Advertisement

समृद्धीचे वडील सीआरपीएफमध्ये सेवेत आहेत. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले होते. समृद्धी आपल्या सावत्र आईकडे रहात होती. तिच्या आजी-आजोबांनी त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. एपीएमसी पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली होती. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाला आहे. तिच्या आतड्यांना धक्का पोहोचल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले असून मारहाणीत तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त झाल्यामुळे पोलिसांनी गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article