For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

12 वर्षे संशयित राहत होता गोव्यात

08:11 AM Dec 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
12 वर्षे संशयित  राहत होता गोव्यात
Advertisement

पुण्यातील 17 कोटी घोटाळा प्रकरणातील मास्टरमाईंड : नावासह आधारकार्ड, पॅनकार्डही बनावट  सीबीआयकडून अटक

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

गोवा हे देशभरातील गुन्हेगारांना आश्रयस्थान असल्याचे यापूर्वी अनेकवेळा उघड झाले आहे. कुठेही परप्रांतात गुन्हेगार गुन्हा करतात आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी गोव्यात आश्रय घेतात. अशाच एक धक्का देणारा प्रकार उघडकीस आला आहे. 17 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणातील मास्टरमाईंड गेल्या 12 वर्षांपासून नाव बदलून गोव्यात राहत होता आणि त्याचा कुणालाच ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर त्याला सीबीआय पोलिसांनी गोव्यात येऊन अटक केली तेव्हा त्याच्याबाबतचा खरा प्रकार उघडकीस आला.

Advertisement

संशयित आशुतोष पंडित हा पुणे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नाव बदलून यतीन शर्मा या नावाने गोव्यात बांबोळी येथे राहत होता. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे  सीबीआयने त्याचा शोध लावला आणि बांबोळी येथे धाड घालून त्याला अटक केली. 2013 साली पुण्यात झालेल्या बँक घोटाळा प्रकरणातील तो मास्टरमाई&ंड आहे. पुण्यातील ‘हाऊस ऑफ लॅपटॉप्स’ कंपनीच्या संचालकाने इंडियन ओव्हरसीज बँकेत 17 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्या प्रकरणातील तो मास्टरमाई&ंड असून गेली कित्येक वर्षे पोलिस त्याच्या शोधात होते.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि नंतर ही तक्रार सीबीआयकडे देण्यात आली होती. पण त्या प्रकरणातील मुख्य संशयित आशुतोष पंडित हा फरार झाला होता. त्यामुळे तपासकार्य अडकून राहिले होते. 2018 साली न्यायालयाने आशुतोष याला फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. पण तो नक्की कुठे आहे हे कुणालाच माहीत नव्हते. आशुतोष चलाखीने गोव्यात राहत होता. बांबोळी येथे राहताना त्याने आपली जुनी ओळख  पूर्णपणे मिटवली होती. त्याने केवळ आपले नावच बदले नव्हते तर  सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवून ‘यतीन शर्मा’ या नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि दोनवेळा पासपोर्टसुद्धा मिळविला होता. या बनावट कागदपत्रांच्या आधाराने त्याने आपले नवे साम्राज्य गोव्यात उभारले होते.  आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रसिध्द असलेल्या बागा-कळंगुट येथे ‘हॅमर्स’ या नाईट क्लबचा तो सीईओ आणि भागीदार म्हणून काम करीत होता. शेजाऱ्यांसाठी तो एक सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित नागरिक भासवित होता, पण त्याच्या मुखवट्यामागे गुन्हेगारी तोंड लपले होते.

12 वर्षांपासून सुरु असलेले घोटाळा प्रकरण अखेर ‘नॅटग्रिड’ या डिजिटल गुप्तचर प्रणालीमुळे उघडकीस आले. आशुतोषचा ठावठिकाणा व हालचाली सीबीआयच्या लक्षात येताच, पथकाने सापळा रचून तो राहत असलेल्या घरावर धाड घातली तेव्हा त्याची फसवेगिरी उघडकीस आली. या कारवाईमुळे गोव्यातील  नाईट क्लब व्यवसाय, गुन्हेगारीने राज्यात खळबळ माजवली आहे.

Advertisement
Tags :

.