For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसुर्तेत सर्व्हे अधिकारी-कर्मचाऱ्यांना पिटाळले

10:59 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसुर्तेत सर्व्हे अधिकारी कर्मचाऱ्यांना पिटाळले
Advertisement

नियोजित धरणाच्या सर्व्हेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव : पिकाऊ जमीन जात असल्याने चिंता : शेतकऱ्यांना न्याय्य देण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/उचगाव

बसुर्ते येथे नियोजित धरणाच्या कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून गुऊवारी सर्व्हे करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सर्व्हे करत असल्याचा सुगावा ग्रामस्थांना लागताच संपूर्ण गाव घटनास्थळी धावत सुटले आणि सर्व्हे करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना पिटाळून लावले. सदर घटना गुऊवार दि. 31 ऑक्टोबर रोजी घडली. बसुर्ते गावच्या पश्चिमेला वैजनाथ, देवरवाडी डोंगराच्या पायथ्याशी यापूर्वी छोटेशे धरण आहे. याच धरणाचे मोठ्या धरणात रुपांतर करण्याचा संकल्प शासनाचा आहे. मात्र हे करत असताना या भागातील जवळपास 250 एकर पिकाऊ  जमीन धरणाच्या पाण्याखाली जाणार असल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. बसुर्ते गावाशेजारीच अनेक शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन आहे. या जमिनीत खरीप हंगामातील बटाटा, भुईमूग, जोंधळा, मका, मिरची अशी विविध पिके याच भागात घेतली जातात.

Advertisement

सदर गावातील अनेक शेतकरी याच जमिनीवर अवलंबून असून, आपली उपजीविका चालवत असतात. हीच जमीन जर त्या धरणात गेली तर आपण जगावे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असून याचा जाब ते शासनाला विचारत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांनाही निवेदने देऊन या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची निवेदनाद्वारे विनंती केली आहे. एकीकडे सर्वांना पाण्याचीही नितांत गरज आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग भविष्यात या भागातील हजारो एकर शेतीला तसेच पिण्यासाठीही होऊ शकतो. मात्र याबरोबरच दुसरी बाजू शेतकऱ्यांच्या जमिनी जर धरणात गेल्या तर त्यांनी जगावे कसे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत बसुर्ते ग्रामस्थांचे आहे. सर्व्हे करण्याचा सुगावा लागताच सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना घेराव घातला. यावेळी तालुक्यातील धनंजय जाधवसह काही नेते मंडळींनीही शेतकऱ्यांचीच बाजू त्यांनी उचलून धरली आणि प्रथमता या शेतकऱ्यांना न्याय द्या, त्यानंतर या जागेचा सर्व्हे करा असे या शासकीय अधिकाऱ्यांना ठासून सांगितले. आणि अखेर त्यांना पिटाळून लावले.

Advertisement
Tags :

.