For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी दाखल याचिकेवर लवकर निर्णय घेण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिला आहे. हा चित्रपट इस्लामच्या मान्यतेच्या विरोधात असून विवाहित मुस्लीम महिलांचे यात चुकीचे चित्रण दर्शविण्यात आल्याचे याचिकेत म्हटले गेले होते. न्यायाधीश विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय होत नाही, तोवर चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती राहणार असल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता हे प्रदर्शन टाळण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने चित्रपटातील दृश्यं पाहून सेन्सॉर बोर्डाला एक समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्यं पाहून त्यावर मतप्रदर्शन करण्याचा निर्देश समितीला देण्यात आला असल्याची माहिती याचिकाकर्त्याच्या वकील फौजिया शकील यांनी दिली. तर आक्षेप घेण्यात आलेली सर्व दृश्यं हटविण्यात आली असल्याचा युक्तिवाद चित्रपट निर्मात्यांच्या वतीने करण्यात आला. तर न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आहे. प्रदर्शनाला स्थगिती दिल्यास आर्थिक नुकसान होण्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला. चित्रपटाचा टीझर इतका आक्षेपार्ह आहे, मग पूर्ण चित्रपटात काय असेल अशी प्रश्नार्थक टिप्पणी न्यायाधीशांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.