सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांपर्यंतच
12:15 PM Feb 03, 2025 IST
|
Pooja Marathe
Advertisement
गेली ५ दिवस सुरू राहिलेल्या किरणोत्सवाची सांगता
चार मिनिटे सुर्यकिरणे स्थिरावली
कोल्हापूर
गेली ५ दिवस भाविकांमध्ये औत्सुक्याचा विषय बनलेल्या अंबाबाईच्या किरणोत्सवाची रविवारी सांगता झाली. अखेरच्या पाचव्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे फक्त अंबाबाईच्या चरणांपर्यंत जाऊन डावीकडे लुप्त झाली. दुपारनंतर आकाशात तयार झालेले ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत कायम होते. तसेच रविवारच्या सुट्टीचे औचित्य परगावाहून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे अंबाबाई मंदिरातील आद्रतेचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत गेले होते. हवेत धुलीकणही वाढले होते. त्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत गेलेल्या सूर्यकिरणांचा प्रवास विस्कळीत झाला.

Advertisement
Advertisement
Advertisement