Heatwave India | सूर्य आग ओकतोय! विदर्भासह अनेक राज्यांत 'ऑरेंज अलर्ट'; उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत
उत्तर भारतासह अनेक राज्यांत ऑरेंज अलर्ट;
पुणे -विदर्भासह देशाच्या अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, उत्तरप्रदेशात पारा ४७ तर विदर्भात ४६ अंश सेल्सिअसच्या बर पोहोचला आहे. सोमबारी देखील अनेक राज्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट असून, यानंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी अकोल्यात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
उत्तर, मध्य तसेच वायव्येकडील अनेक राज्यांत तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. अनेक भागातील पारा ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भात रविवारी उष्णतेचा पारा अधिक होता. गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यात उष्ण व दमट हवामान असून, सोमवारी देखील ते कायम राहणार आहे.
या राज्यातील बहुतांश शहरांचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. यंदाचा उन्हाळा तीव्र असून, यंदाच्या हंगामात दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक तापमान नोंदविले जात आहे. शनिवारी उत्तर प्रदेशात बांदा येथे सर्वाधिक ४७.४ इतके, तर रविवारी अकोल्यात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस इतके तापमाननोंदविण्यात आले.
पारा घटणार, अवकाळी येणारमंगळवारनंतर मध्य, वायव्य, उत्तर भागातील उष्णतेची लाट ओसरणार असून, या भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कमाल तापमानात घट होणार असून, उष्णतेपासून दिलासा
मिळणार आहे. दक्षिणेकडील भागात मात्र उष्ण-दमट हवामान कायम राहणार आहे.
नाशिकच्या व्यक्तीचाउष्माघातामुळे परभणीत मृत्यू नाशिक येथून परभणीत भावाकडे आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटनाघडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी बबन कांबळे (वय ३७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शिवाजी कांबळे हे नाशिक येथील पिंगळे मळा येथे वास्तव्यास आहेत. गुरुवार ते त्यांचे बंधू महादेव बबन कांबळे यांच्याकडे आले होते.
दिवसभर बाहेर फिरल्याबर त्यांना चक्कर आली आणि ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत सापडले. यानंतर त्यांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.