सातार्डाच्या नेहा मयेकर हिला एम .फार्मामधून सुवर्णपदक
सातार्डा -
सातार्डा गावची सुकन्या कु नेहा तुळशीदास मयेकर हिने आसाममधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ( NIPER ) गोहट्टी येथून एम फार्मा ( M, Pharma ) पदवीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.आसामचे राज्यपाल लक्ष्मीप्रसाद आचार्य यांच्या हस्ते नेहाला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत नेत्रदीपक यश संपादन केल्याने नेहाचे कौतुक केले जात आहे. यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज, सावंतवाडीमधून B Pharma ( बी फार्मा ) विषेश प्रावीण्य मिळविले होते. त्यानंतर GPAT व NIPER हया देश पातळीवरील प्रवेश परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. M Pharma ( एम फार्मा ) साठी देशातील पहिल्या पाच कॉलेजमधील गोहट्टी - आसाम येथे राष्ट्रीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून जिद्दीने व चिकाटीने छाप टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. Pharmacology and texocology ( औषधंशास्त्र व विषशास्त्र ) विषयांमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर NIPER ( नायफर ) मधून नेहा हिला गुजरात - अहमदाबादमध्ये भारतीय बहूराष्ट्रीय कंपनी Zydus याठिकाणी संशोधन केंद्रामध्ये नियुक्ती मिळाली आहे. नेहा हिच्या नेत्रदीपक यश मिळविल्याने सर्वत्र कौतुक केले जात असून ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे.