महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार

06:29 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘प्रोजेक्ट-75 आय’ने पकडला वेग : नौदलाला मिळणार 6 नव्या पाणबुडी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दीर्घकाळापासून प्रलंबित प्रोजेक्ट-75आने आता काही प्रमाणात वेग पकडला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत भारतीय नौदलाला 6 नव्या पाणबुड्या प्राप्त होणार आहेत. या पाणबुडी एअर इंडिपेंडेंट प्रपल्शनयुक्त (एआयपी) असतील, ही सिस्टीम पाणबुडीला अधिक काळापर्यंत पाण्यात राहण्यास सहाय्यभूत टरते. सध्या नौदलाकडे अशाप्रकारची एकही पाणबुडी नाहसच. तर पाकिस्तानकडे एआयपीयुक्त पाणबुडी आहे, परंतु ती अत्यंत जुनी झाली आहे. पाकिस्तानसाठी चीन 8 नव्या पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.

प्रोजेक्ट-75 आय स्टॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत साकारण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत नौदलाने एलअँडटी आणि एमडीएलला आरएफपी जारी केले होते. एलअँडटी जर्मन कंपनी टीकेएमएससोबत मिळून काम करत आहे. तर एमडीएल स्पेनच्या नावंतिया कंपनीसोबत मिळून काम करत आहे. या प्रोजेक्टपासून प्रोजेक्ट-75 सुरू करण्यात आला होता, तेव्हा देखील भारतातच पाणबुडी निर्माण करण्यात आली होती, परंतु डिझाइन विदेशी कंपनीचे होते.

तर प्रोजेक्ट-75आय अंतर्गत विदेशी कंपनी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणार आहे, यामुळे स्वदेशी कंपनीची क्षमता वाढणार असून भविष्यात स्वत:च सबमरीन डिझाइन आणि तिचा विकास करण्यास सक्षम होऊ शकेल. एलअँडटी आणि एमडीएल यापैकी एका कंपनीची प्रोजेक्ट-75आयसाठी निवड केली जाणार आहे.

किती कालावधी लागणार?

पाणबुडीसाठी तांत्रिक मूल्यांकन झाले असून काही दिवसांपूर्वी फील्ड मूल्यांकनही पार पडले आहे. आता स्टाफ मूल्यांकन होणे शिल्लक आहे. ही प्रक्रिया देखील 2-3 महिन्यांत पूर्ण होणार आहे. ज्यानंतर संरक्षण मंत्रालयाला अहवाल सादर केला जाईल. संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिल्यावर करार वाटाघाटी समिती यावर विचार करणार आहे. समितीकडून मंजुरी मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीकडून हिरवा कंदील मिळविला जाईल. एखाद्या कंपनीसोबत करार झाल्याच्या 3-4 वर्षांमध्ये ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील होण्यास सुरुवात होणार आहे. सध्या नौदलाकडे 16 पारंपरिक पाणबुड्या आहेत. यातील 5 कल्वरी क्लास पाणबुड्या आहेत. आणखी एक कल्वरी क्लास पाणबुडी लवकरच नौदलाला प्राप्त होणार आहे. तर नौदलाकडील उर्वरित पाणबुड्या 30 वर्षांपेक्षा जुन्या असून त्यांना लवकरच ताफ्यातून निवृत्त केले जाणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article