For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इग्ला-एस’मुळे वाढले भारतीय सैन्याचे बळ

06:48 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इग्ला एस’मुळे वाढले भारतीय सैन्याचे बळ
Advertisement

रशियन हवाई सुरक्षा यंत्रणा : चीन अन् पाकिस्तानच्या सीमेवर होणार तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सैन्याला रशियाकडून इग्ला-एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम (मॅनपॅड्स)च्या पहिल्या तुकडीचा पुरवठा करण्यात आला आहे. पहिल्या तुकडीत 24 इग्ला-एसचा पुरवठा करण्यात आला असून यात 100 क्षेपणास्त्रांचा देखील समावेश आहे. संबंधित करारानुसार इग्ला-एसची आता भारतात देशांतर्गत स्तरावर देखील निर्मिती होणार आहे. इग्ला-एस सिस्टीममुळे भारतीय सैन्याच्या अत्यंत कमी अंतराच्या हवाई सुरक्षा क्षमतेत भर पडणार आहे.

Advertisement

इग्ला-एस ही हाताने संचालित करता येणारी डिफेन्स सिस्टीम असून ती एक सैनिक किंवा चालक दलाकडून देखील संचालित करता येऊ शकते. कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांना पाडण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा क्रूझ क्षेपणास्त्रs आणि ड्रोन यासारख्या हवाई लक्ष्यांची ओळख पटवत त्यांना लक्ष्य करू शकते. इग्ला-एस प्रणालीत 9एम342 क्षेपणास्त्र, 9पी522 लाँचिंग मॅकेनिझम, 9व्ही866-2 मोबाईल टेस्ट स्टेशन आणि 9एफ719-2 टेस्ट सेट सामील आहे. एअर डिफेन्स सिस्टीममध्ये या सर्व प्रणाली एकत्रितपणे काम करतात. ही क्षेपणास्त्र यंत्रणा 500 मीटर ते 6 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. तर 5 सेकंदांत ही यंत्रणा सक्रिय होते आणि 10-3500 मीटरच्या उंचीपर्यंत भागांमध्ये काम करू शकते.

भारताने मागील वर्षी रशियासोबत 120 लाँचर आणि 400 क्षेपणास्त्रांच्या खरेदीकरता करार केला होता. याच्या अंतर्गत पहिल्या तुकडीचा पुरवठा रशियाकडून करण्यात आला आहे. तर उर्वरित लाँचर आणि क्षेपणास्त्रs तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अंतर्गत भारतीय कंपनीकडून भारतातच निर्माण करण्यात येणार आहेत. इग्ला-एस यंत्रणेला पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात केले जाणार आहे. पर्वतीय भागांमध्ये इग्ला-एस मॅनपॅड्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. भारतीय सैन्याच्या एका रेजिमेंटला यापूर्वीच इग्ला-एस एअर डिफेन्स सिस्टीम मिळाली आहे. भारतीय सैन्यात आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या जुन्या इग्ला-1 एम सिस्टीमला इग्ला-एसद्वारे बदलण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.