For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पडद्यावर दिसणाऱ्या खऱ्या ‘धुरंधर’ची कहाणी

06:36 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पडद्यावर दिसणाऱ्या खऱ्या ‘धुरंधर’ची कहाणी
Advertisement

रॉ पहिल्या प्रमुखाचा बायोपिक येणार

Advertisement

करण जौहर पुन्हा एका लेजेंडची कहाणी मोठ्या पडद्यावर आणणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाची घोषणा करत एक टीझरही जारी केला आहे. रॉचे संस्थापक रामेश्वर नाथ काओ यांच्यावर एक चित्रपट निर्माण करण्यात येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2028 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

हा चित्रपट नितिन गोखले यांनी आर.एन. काओ यांच्यावर लिहिलेले पुस्तक ‘जेंटलमॅन स्पायमास्टर’वर बेतलेला असणार आहे. रामेश्वर नाथ काओ हे भारतीय गुप्तहेर आणि पोलीस अधिकारी होते. त्यांनी 1960 च्या दशकात भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंगची स्थापना केली होती. सिक्कीमच्या भारतातील विलीनीकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काओ यांनी 1947 साली आयबीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ते भारताच्या 3 पंतप्रधानांचे निकटवर्तीय सल्लागार आणि सुरक्षाप्रमुख होते. पुढील काळात एव्हिएशन रिसर्च सेंटर आणि रॉचे प्रमुख झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.