महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोष्ट मंत्र्यांच्या दुसऱ्या लग्नाची

12:07 PM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समाज माध्यमावरील व्हिडिओने उडाली खळबळ : लग्नाला नाही, तर किमान बारशाला तरी बोलवा

Advertisement

पणजी : वास्कोतील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने जारी केलेला एक व्हिडिओ सध्या राज्यभर चर्चेत आहे. या महिलेने एका मंत्र्याने पुन्हा एकदा विवाह केला आणि त्याच्या लग्नसोहळ्dयाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला का दिले नाही? असा सवाल कऊन अत्यंत शालजोडीतील असे रेशमी चिमटे काढून संपूर्ण गोव्यात धम्माल उडवून दिली आहे. या महिलेने सदर व्हिडिओमध्ये त्याला ‘तो मी नव्हेच’ असा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या या व्यंगात्मक पद्धतीने उत्तम असे सादरीकरणाने साऱ्या गोव्यातच धुमाकूळ उडवून दिला आहे. नव्याने विवाह केलेला हा मंत्री कोण? अशी चर्चा मंत्रालयात व सत्ताधारी विधीमंडळ गटातही रंग भरत आहे. विधानसभा अधिवेशन दि. 15 जुलैपासून होत आहे, त्या पार्श्वभूमीवर जारी केलेला हा व्हिडिओ चर्चेत येऊ शकतो.

Advertisement

डॉ. सावंत मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने पुनर्विवाह केल्याचे त्यात म्हटलेले आहे. या संदर्भात कोणताही पुरावा मिळालेला नाही व हे वृत्त खोटे असल्याचा दावाही कोणीही केलेला नाही. त्यामुळे हा मंत्री नेमका कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अत्यंत मार्मिक अशा पद्धतीने हा व्यंगात्मक असा व्हिडियो तयार केलेला आहे व तो समाज माध्यमातून संपूर्ण गोव्यात पसरला आहे. यावऊन मात्र  काहीजणांना हे ओपन सिक्रेट वाटत आहे, असे असले तरी मुख्यमंत्र्यांसह कोणीही यावर भाष्य केलेले नाही. सदर महिलेने मार्मिक पद्धतीने टिप्पणी करताना लग्न सोहळ्dयाला नाही किमान पुढे बारशाला तरी बोलवा असा सल्लाही दिला आहे. यामुळे एकच हलकल्लोळ माजला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article