For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरलम नावामागील कहाणी

06:01 AM Mar 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
केरलम नावामागील कहाणी
Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव बदलून केरलम करण्यास अलिकडेच मंजुरी दिली आहे. हा बदल मल्याळी भाषेत राज्याची खरी ओळख समोर ठेवतो. नाव परिवर्तनामागे पौराणिक कथा, ऐतिहासिक संदर्भ आणि भाषिक तर्क आहे. भगवान परशुरामाच्या कथेपासून मौर्य सम्राट अशोकच्या शिलालेखांपर्यंत केरळचे नाव अनेक रुपांमध्ये समोर येते. अशास्थितीत केरळचे नाव बदलून केरलम का करण्यात आले  हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत आहे.

Advertisement

केरळ ते केरलमपर्यंत : नाव बदलण्याचा पुढाकार का?

केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी राज्याचे नाव बदलून केरळ ऐवजी केरलम करण्यासंबंधी एक प्रस्ताव संमत केला होता. ‘आमच्या राज्याचे नाव मल्याळी भाषेत केरलम आहे’ असे प्रस्तावात म्हटले गेले होते. राज्यांची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषेच्या आधारावर करण्यात आली होती. केरळ पिरावी दिन देखील 1 नोव्हेंबर रोजीच साजरा करतो. राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यापासूनच मल्याळी भाषिक लोकांसाठी संयुक्त केरळच्या स्थापनेची मागणी प्रबळ राहिली आहे. परंतु राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीत राज्याचे नाव ‘केरळ’ म्हणून नोंद होते.

Advertisement

भाषिक ओळख अन् मल्याळीचा सवाल

केरळ राज्य भाषेच्या आधारावर निर्माण करण्यात आले होते. राज्याची स्थानिक बोलीभाषा मल्याळी राहिली आहे. मल्याळी भाषेत राज्याचे नाव केरलम आहे. स्थानिक लोक राज्याला केरलम असेच संबोधित राहिले आहेत. परंतु इंग्रजीत राज्याचा उल्लेख केरळ असा होतो. या दाक्षिणात्य राज्याच्या नाव परिवर्तनावरून अनेक तर्क समोर आले आहेत. याविषयी इतिहास आणि पौराणिक संदर्भही महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्षात केरळ किंवा केरलम नाव ठेवण्यामागे कुठलाही एक तर्क काम करत नाही तसच कुठलीच एक कहाणी याच्या नावाचे मूळ समोर आणत आहे. लोकमान्यता आणि इतिहासाच्या कहाण्यांमध्ये वेगवेगळे संदर्भ दिसून येतात.

 

परशुरामाची भूमी

पौराणिक कथांनुसार केरलमला भगवान परशुरामाची भूमी म्हटले गेले आहे. केरोलपोथी (केरलमच्या लोककथांचा ग्रंथ) समवेत अनेक पुराणांमध्ये या कहाणीचा उल्लेख आढळून येतो. केर म्हणजे जल आणि अलम म्हणजे भूमी म्हणजेच जलातून निघालेली भूमी म्हणून केरलम म्हटले जाते.

अशोकच्या शिलालेखांमध्ये ‘केरलपुत्रा’चा उल्लेख

इतिहासात केरलम नावाचा सर्वात प्राचीन पुरावा सम्राट अशोकच्या ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाच्या शिलालेखांमध्ये मिळतो. अशोकच्या शिलालेखांमध्ये केरलपुत्र नाव असल्याचे इतिहासकारांचे सांगणे आहे. याचा अर्थ केरळचा पुत्र किंवा केरळचा शासक असा होतो. तर इतिहासकार आर.सी. मजूमदार यांनी स्वत:चे पुस्तक ‘एन्शिएंट इंडिया’मध्येही ‘केरलपुत्र’ शब्द आणि संबोधनाचा उल्लेख केला आहे.

चेरा वंश अन् केरल शब्दाचा  ऐतिहासिक प्रवास

दक्षिण भारताच्या प्राचीन इतिहासाचे जाणकार के. ए. नीलकंठ शास्त्राrही स्वत:चे पुस्तक ‘ए हिस्ट्री ऑफ साउथ इंडिया’मध्ये चेरा, चोल आणि पांड्या राजघराण्यांचा उल्लेख करतात. ज्यात एक तथ्य हे देखील समोर येते की ‘केरल’ नावाचा संबंध चेरा वंशाशी निगडित असू शकतो. चेरा शासकांचा भाग काळासोबत ‘चेरालम’ म्हणवून घेत होता, हेच बदलत बदलत ‘केरलम’ झाल्याचा शास्त्राr यांचा तर्क आहे. दक्षिण भारतीय भाषांमध्ये ‘च’ आणि ‘क’च्या बदलाची उदाहरणे मिळतात, याचमुळे ‘चेरा’पासून केरा’ आणि मग ‘केरल’ होणे काही अशक्य गोष्ट नाही.

भाषाशास्त्राचा तर्क : ‘चेरा’पासून ‘केरलम’पर्यंत

मल्याळी भाषेच्या लिपीत जेव्हा ‘त’ वर्गाचे व्यंजन (टी, एन)सोबत ‘इ’ किंवा ‘ऐ’ असे स्वर जोडले जातात, तेव्हा अनेकदा ‘च’ वर्गाच्या ध्वनींमध्ये बदलतात असे भाषातज्ञही मानतात. केरळची भाषा मल्याळी आणि अन्य द्रविड भाषांच्या विकासात ‘च’ आणि ‘क’च्या दरम्यान बदल (पॅलटालायजेशन अणि व्हेलरीजायशेन) मोठे वैशिष्ट्या म्हणून ओळखले जात राहिले आहे. खासकरून प्राचीन तमिळ-मल्याळीपासून आधुनिक रुपांमध्ये हे बदल दिसून येतात. उदाहरणार्थ हिंदीचा ‘हाथ’ तमिळमध्ये ‘कइ’ अणि तेलगूत ‘चेई’ होतो. हिंदीतील कानाला तमिळ आणि तेलगूमध्ये ‘चेवि’ म्हटले जाते. केरळची ओळख चेरा राजघराण्याशी खोलवर जोडलेली राहिली आहे. संगम साहित्यात चेरा शासक आणि त्यांच्या भूभागाचा उल्लेख मिळतो, जो या क्षेत्राची प्राचीनता समोर आणतो आणि याचबरोबर नावाच्या ओळखीलाही असे इतिहासकार ए. श्रीधर मेनन यांचे सांगणे आहे.

‘केरा’ म्हणजेच नारळाशी निगडित नाव?

केरलम नाव हे नारळाशी जोडलेले असल्याचेही मानले जाते. ‘केरा’ शब्दाचा अर्थ नारळाचे झाड आणि ‘आलम’ शब्दाचा अर्थ स्थान असा सांगण्यात येतो. अशाप्रकारे केरलमचा अर्थ नारळांची भूमी असा होतो. परंतु इतिहासकार याला लोकमान्यता आणि भौगोलिक स्थितीच्या आधारावर जोडून पाहतात, परंतु याचे ऐतिहासिक पुरावे मिळत नाहीत. केरळचे किनारी क्षेत्र शतकांपासून नारळ उत्पादनासाठी ओळखले जात राहिले आहे. विदेशी प्रवासी आणि अरबी व्यापाऱ्यांकडून या भागातील हिरवाई आणि नारळाच्या बहुलतेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचमुळे नामकरणाची ही व्याख्या सामान्य लोकांना सहज अन् सरळ वाटते.

पर्वत, समुद्र अन् ‘चराल’ची जमीन

भौगोलिक स्थितीलाही नावासाठी कारणीभूत मानले जाते. स्थानिक लोक ‘चराल’  (पर्वतीय उतार) शब्दापासून केरलमची उत्पत्ती झाल्याचे मानतात. पश्चिम घाटातील पर्वतरांग केरळच्या भूगोलाचा महत्त्वाचा हिस्सा आहे. समुद्राच्या दिशेने या पर्वतरांगेच उतार आणि मग किनाऱ्याच्या दिशेने फैलावलेले विशाल मैदान म्हणजेच चराल, चेराला, चेरालम अणि केरलमच्या शब्द यात्रेसाठी अत्यंत योग्य ठरत असल्याचे वाटते. अशाप्रकारे केरलम केवळ एक भौगोलिक नाव नाही, तर दोन हजारांपेक्षा अधिक वर्षांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भाषिक प्रवासाचा परिणाम आहे. प्रत्यक्षात हे केवळ एक अक्षर जोडण्याचे प्रकरण नाही, तर भाषा आणि इतिहासाशी जोडलेल्या सांस्कृतिक आत्मसन्मानाचा सवाल आहे. केरळ ते केरलमचा प्रवास प्रशासकीय निर्णयापेक्षा अधिक ओळखीच्या वापसीच्या रुपात पाहिला जात आहे.

कुठे गायब झाले त्रावणकोर?

नावात बदलानंतर केरळ हे भारताचा कसा हिस्सा झाले आणि त्रावणकोर संस्थानाचे काय झाले हे जाणून घेणे गरजेचे ठरणार आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतासमोर सर्वात मोठे प्रशासकीय आव्हान शेकडो संस्थानांच्या विलीनीकरणाचे होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात बहुतांश संस्थानांना भारतात सामील करण्यास तयार करण्यात आले होते. 1 जुलै 1949 रोजी त्रावणकोर आणि कोचीच्या संस्थानांना मिळून एक नवी प्रशासकीय शाखा निर्माण करण्यात आली. याला त्रावणकोर-कोची म्हटले जायचे. तसेच ‘थिरू-कोची’ नावानेही ओळखले जाते. त्रावणकोराचे महाराज चिथिरा थिरुनल बलराम वर्मा नव्याने निर्मित राज्याचे राजप्रमुख झाले होते. त्रावणकोरचे यानंतर एक स्वतंत्र संस्थान म्हणून अस्तित्व संपुष्टात आले होते.

ऐक्य केरळ चळवळ

स्वातंत्र्यानंतर प्रारंभिक वर्षांमध्ये मजबूत लोकचळवळीने भारतीय राज्यांना जुन्या संस्थानांना सीमांऐवजी भाषेच्या आधारावर पुनर्रचित करण्यात यावे अशी मागणी केली होती. केरळ प्रकरणी ऐक्य केरळ चळवळीने सर्व मल्याळी भाषिकांच्या भागांना एका राज्यात मिळविण्यावर जोर दिला. या मागणीला 1956 मध्ये लागू स्टेट्स रिऑर्गनायझेशन अॅक्टद्वारे पूर्ण करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी आधुनिक केरळ राज्य अधिकृतपणे झाले. याच्या पुनर्रचनेच्या अंतर्गत मद्रास प्रेसिडेन्सीच्या मालाबार जिल्हा आणि साउथ कनाराच्या कासरगोड तालुक्याला त्रावणकोर-कोचीमध्ये सामील करण्यात आले. तर त्याचवेळी दक्षिण त्रावणकोरमधील तमिळ भाषिक भाग म्हणजेच कन्यापुमारी आणि शेनकोट्टई तत्कालीन मद्रास राज्यात जोडण्यात आले, ज्याला आता तामिळनाडू नावाने ओळखले जाते.

राजप्रमुखाचे पद संपुष्टात

1956 मध्ये केरळच्या निर्मितीनंतर राजप्रमुखाचे जुने पद संपुष्टात आणले गेले. राज्याने पूर्ण भारतात अवलंबिण्यात येणाऱ्या स्टँडर्ड कॉन्स्टीट्यूशनल स्ट्रक्चर अंतर्गत काम करण्यास सुरुवात केली होती. यात गव्हर्नरला कॉन्स्टीट्यूशनल हेड आणि एक निवडून आलेल्या लेजिसलेटिव्ह असेंब्लीच्या रुपात नियुक्त करण्यात आले. अशाप्रकारे त्रावणकोरच्या शाही प्रशासनाची ओळख हळूहळू प्रजासत्ताक भारताच्या लोकशाही चौकटीत मिसळून गेली. त्रावणकोर संस्थानाचे अस्तित्व संपले असले तरीही त्याने सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय वारशात मोठे योगदान दिले आहे. याचा ऐतिहासिक प्रभाव केरळच्या संस्था आणि समाजात खोलवर जोडलेला आहे.

संकलन : उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :

.