For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सज्जनगडावरील बुरुजाची दगडे पावसाने आली खाली

05:26 PM Aug 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
सज्जनगडावरील बुरुजाची दगडे पावसाने आली खाली
Sajjangarh came down
Advertisement

सातारा प्रतिनिधी

सातारा तालुक्यातील सातारा शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सज्जनगडावर जाणाऱ्या प्रमुख छ. शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूच्या बुरुजाची दगडे रविवारी रात्री सुरु असलेल्या पावसाने पायऱ्यावर खाली आली. दोन दिवस झाले तरीही ती दगडे तशीच आहेत. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.

Advertisement

सातारा तालुक्यातील सज्जनगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी दररोज भाविक तसेच पर्यटक भेट देतात. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड ओळखला जातो. या गडावर जाणाऱ्या मुख्य महादरवाजाच्या उजव्या बाजूच्या बुरुजाची दगडे सुरु असलेल्या पावसामुळे रविवारी रात्री 8.30 वाजता खाली आली. त्यावेळी जोरात आवाज मार्गावर झाला. सुदैवाने कोणीही तेथून जात नव्हते. गडावर आणि गडाच्या पायथ्यालाच थांबलेल्यांनी हा आवाज ऐकल्याचे सांगण्यात येते. सुरु असलेल्या पावसामुळे ही पडझाड झाली आहे. तसेच पार्किंगच्यावरील रस्त्यावरही मातीचा भराव ढासळला आहे. दोन दिवस झाले ढासळलेली दगडे तशीच रस्त्यात पडलेली आहेत. त्यामुळे त्या दगडाच्यावरुन येजा करावी लागते. सातारा तालुका प्रशासनाच्यावतीने तेथे जावून दगडे बाजूला केली नाहीत. वा काही उपाययोजना केली नसल्याने गडप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.