For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवव्या दिवशी शेअर बाजाराची घसरण थांबली

06:57 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवव्या दिवशी शेअर बाजाराची घसरण थांबली
Advertisement

रिलायन्स, एचडीएफसीचे समभाग तेजीत, निफ्टीत 30 अंकांची तेजी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग आठ दिवस सुरु असणारी बाजाराची घसरण अखेर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी थांबलेली पहायला मिळाली. रिलायन्स आणि एचडीएफसी बँक यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हलक्या तेजीसमवेत बंद झाले.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 57 अंकांनी वाढत 75996 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 30 अंकांच्या तेजीसमवेत 22959 अंकांवर बंद झाला. सोमवारी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 300 अंकांनी घसरत 75641 अंकांवर खुला झाला होता. दुसऱ्या सत्रामध्ये बाजार काहीसा सावरत अखेर हलक्या तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला. बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड कॉर्प, इंडसइंड बँक, अदानी पोर्टस, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, झोमॅटो आणि टाटा मोटर्स यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे महिंद्रा आणि महिंद्रा, भारती एअरटेल, टीसीएस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. एंटरप्रायझेसचा समभाग सर्वाधिक 3.31 टक्के वाढीसोबत बंद झाला तर महिंद्रा आणि महिंद्राचा समभाग 3.77 टक्के घसरत बंद झाला.2025 मध्ये आजपर्यंत पाहता विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 99299 कोटी रुपये बाजारातून काढले असल्याची माहिती उपलब्ध झाली.

जागतिक स्थितीचा परिणाम

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाकडून आयात शुल्क आकारणीच्या पार्श्वभूमीवर जागतिक तणावाचे वातावरण पहायला मिळते आहे. विविध कंपन्यांचे तिमाही निकालसुद्धा योग्य न लागल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर पहायला मिळाला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता फार्मा, बँक, फायनान्शीयल सर्व्हिसेस, हेल्थकेअर, ओएमसी, कंझ्युमर डूरेबल्स आणि मेटल क्षेत्राचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले. ऑटो निर्देशांक मात्र घसरणीसोबत बंद झाला. बँक निफ्टी 0.32 टक्के वाढत 49259च्या स्तरावर तर फार्मा निर्देशांक 1.57 टक्के वाढत 21076च्या स्तरावर बंद झाला.

Advertisement
Tags :

.