For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुधवारच्या सत्रात शेअर बाजार घसरणीत

06:41 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुधवारच्या सत्रात शेअर बाजार घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 244 अंकांनी घसरणीत, आयटी समभागांमध्ये दबाव

Advertisement

मुंबई :

धातू समभागांमध्ये तेजीत असतानाही आयटी आणि ऑटो समभागांच्या विक्रीमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 244 अंकांनी तर निफ्टी 66 अंकांनी कमकुवत होत बंद झाला.

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 244 अंकांनी घसरत 83382 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 66अंकांनी घसरत 25665 अंकांवर बंद झाला. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पहिल्यास ऑटो, आयटी, फायनान्सीयल, एफएमसीजी, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. एफएमसीजीचा निर्देशांक 318 अंकांनी घसरत 52258 च्या स्तरावर बंद झाला. कमोडीटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, मेटल आणि ऑईल व गॅस यांचे निर्देशांक मात्र तेजीसमवेत बंद झाले. यातही सर्वाधिक चमकदार कामगिरी ही मेटल निर्देशांकाने केली होती. सदरचा निर्देशांक 306 अंकांच्या वाढीसोबत 11661 वर बंद झाला.

समभागांची कामगिरी

विविध समभागांच्या कामगिरीकडे पाहता टाटा स्टिल, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, हिंडाल्को, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, बीईएल, बजाज ऑटो, टाटा मोटर्स पीव्ही, श्रीराम फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर, रिलायन्स, इन्फोसिस, आयटीसी यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. यासोबत मिडकॅप निर्देशांकातील एमआरपीएल, हिंदुस्थान झिंक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेल व एचडीएफसी एएमसी यांचे समभागही तेजीमध्ये पहायला मिळाले. दुसरीकडे एशियन पेंटस्, टीसीएस, मारुती सुझुकी, सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, विप्रो, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा, टाटा कंझ्युमर, टायटन, अपोलो हॉस्पिटल, लार्सन टूब्रो यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

जागतिक बाजारात पाहता बुधवारी आशियाई बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. जपानमध्ये अचानक निवडणुका होणारा असल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदार सावधगिरी बाळगून होते. हाँगकाँगचा हॅगसेंग 0.34 टक्के वाढला होता. कोरियाचा कोस्पी 0.34 टक्के घसरणीत होता. जपानचा निक्केई 1.36 टक्के वाढत नव्या विक्रमावर पोहचला होता.

Advertisement
Tags :

.