महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विक्रमी पातळीवरून शेअर बाजार गडगडला

06:49 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 930 अंकांनी घसरला, निफ्टी 21,150 वर बंद

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

जवळपास 72,000 अंकांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर बुधवारी सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली. दिवसअखेरीस 930 अंकांच्या घसरणीसह मुंबई शेअर बाजार निर्देशांक 70,500 च्या जवळ बंद झाला, तर निफ्टीने या काळात 303 अंकांची घसरण नोंदवली. बुधवारी सेन्सेक्स 930.88 (1.30 टक्के) अंकांनी घसरून 70,506.31 वर तर निफ्टी निर्देशांकत 302.95 (1.41 टक्के) अंकांनी घसरत 21,150.15 वर बंद झाला. निफ्टी मिडपॅप आणि निफ्टी स्मॉलपॅप निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. या काळात सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, मीडिया, मेटल, पीएसयू बँक आणि रियल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. भारतातील कोविड सब-व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शेअर बाजारावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article