For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजार मंगळवारी राहिला घसरणीत

06:38 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजार मंगळवारी राहिला घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 416 अंकांनी घसरणीत, ऑटो, बँकांच्यासमभागांची कमकुवत कामगिरीकच्चे तेल भडकले

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 416 अंकांनी घसरत 76886 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 97 अंकांनी घसरत 23995 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकही दबावात होतो, तो दिवसअखेर 863 अंकांनी घसरत 55400 अंकांवर बंद झाला.

Advertisement

हे समभाग तेजीत

मंगळवारी शेअरबाजारात ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, नेस्ले इंडिया, रिलायन्स, डॉ. रे•िज लॅब्ज, हिंडाल्को, आयटीसी, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा, भारती एअरटेल, कोटक बँक, टाटा स्टील, बीईएल यांचे समभाग तेजीत होते. मिडकॅपमधील टाटा केमिकल, ऑईल इंडिया, इंडस टॉवर्स, बीएसई लिमिटेड, पॉलीकॅब, ओरॅकल फायनॅन्शीयल यांचे समभागही मजबुतीसोबत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

घसरणीत पाहता ग्रासिम, ट्रेंट, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो, टायटन, सिप्ला, एनटीपीसी, एसबीआय लाइफ, एचयुएल, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो, मारुती सुझुकी, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स, जियो फायनान्स, विप्रो, एशियन पेंटस्, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, इटर्नल, टाटा मोटर्स पीव्ही, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक यांचे समभाग दबावात होते.

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध निर्देशांकात पाहता कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, मोटल, ऑईल व गॅस, इन्फ्रा, एनर्जी यांचे निर्देशांक मजबुतीसोबत बंद होताना दिसले. दुसरीकडे पाहता ऑटो, फायनॅन्शीयल्स, आयटी, एफएमसीजी, फार्मा, रियल्टी यांचे निर्देशांक घसरणीत होते.

जागतिक बाजारात पाहता दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.39 टक्के इतका तेजीत होता. तर जपानचा निक्केई 1.02 टक्के घसरणीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.95 टक्के कमकुवत होत बंद झाला.

Advertisement
Tags :

.