शेअरबाजार बुधवारच्या सत्रात अखेरच्या क्षणी सावरला
सेन्सेक्स 143 अंकांनी तर निफ्टी 77 अंकांनी नुकसानीत, कच्चे तेल वधारुन पुन्हा घसरले
नफा वसुलीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार बुधवारी अल्पशा घसरणीसह बंद होताना दिसला. सेन्सेक्स 143 अंकांनी आणि निफ्टी 77 अंकांनी घसरत बंद झाला. सुरुवातीच्या सत्रामध्ये बाजार मोठ्या प्रमाणात घसरलेला होता.
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : बुधवारी सरते शेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 143 अंकांनी घसरत 73709 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 77 अंकांनी घसरत 22811 अंकांवर बंद झाला होता. दिवसभराच्या सत्रामध्ये सुरुवातीपासूनच आयटी निर्देशांक दमदार तेजी समवेत कार्यरत होता. दिवसअखेर हा निर्देशांक 906 अंकांनी वाढत 32422 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी बँक निर्देशांक 511 अंकांनी कमकुवत होत 54976 च्या स्तरावर बंद होताना दिसला. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक देखील मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिलेले पहायला मिळाले. निफ्टीतील 34 समभाग घसरणीसोबत बंद झाले. यामध्ये बजाज फायनान्सचा समभाग 3.2 टक्के घसरत बंद झाला. दुसरीकडे इन्फोसीस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा तसेच टीसीएस यांचे समभाग दोन ते तीन टक्के वाढत बंद झाले. मिळालेल्या माहितीनुसार बीएसईवरील सुचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल मूल्य 6.13 लाख कोटी रुपये कमकुवत होत 461.80 लाख कोटी रुपयांवर घसरले होते. जे सोमवारी 467.93 लाख कोटी रुपये इतके होते.
समभागांची कामगिरी
शेअर बाजारात इन्फोसीस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, अल्ट्राटेक स्रिमेंट, एसबीआय लाईफ, भारती एअरटेल, पॉवरग्रीड कॉर्प, रिलायन्स, टाटा कंझ्युमर, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, डॉ. रे•ाrज लॅब्ज, सनफार्मा, पर्सिस्टंट सिस्टीम, केपीआयटी टेक्नॉलॉजी, कोफोर्ज, मॅनकाईंड यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. तर दुसरीकडे घसरणीत पाहता हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, लार्सन टुब्रो, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टिल, टायटन, एचबीआय, सिप्ला, हिंडाल्को, टाटा मोटर्स पी.व्ही., कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, जेएसडब्ल्यू स्टिल, नेस्ले इंडिया, बीईएल, अदानी एन्टरप्रायझेस, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, अॅक्सीस बँक, अपोलो हॉस्पिटल, एसआरएफ, वोडाफोन, कोचिन शिपयार्ड, सीजी पॉवर यांचा समावेश होता.
फक्त आयटी निर्देशांक तेजीत
विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता फक्त आयटी निर्देशांक तेजीत होता. ऑटो, कमोडीटीज, एनर्जी, सीपीएसई, फायनाशियल, एफएमसीजी, इंफ्रा, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले.
