शेअरबाजार अखेरच्या तासात सावरला
आशियाई बाजारात नकारात्मक सूर असताना सुरुवाती मोठ्या घसरणीत असलेल्या भारतीय शेअरबाजारात जोरदार सुधारणा झालेली दिसून आली. अमेरिकेच्या नव्या घोषणेचा परिणाम सकाळच्या सत्रात शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात दिसला. डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रुपया वधारला तर कच्चे तेलही जवळपास 107 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. सेन्सेक्स व निफ्टी अल्पशा तेजीसह बंद होताना दिसले.
वृत्तसंस्था, मुंबई
गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 185 अंकांनी वाढत 73319 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला. तर दुसरीकडे सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात मोठ्या घसरणीत असणारा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 33 अंकांच्या वाढीसोबत 22713 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला. शेअरबाजारात सुरुवात खूपच खराब झाली होती. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 1500 अंकांपर्यंत घसरला होता तर निफ्टीदेखील 500 अंकांनी घसरणीत होता. बाजारात अखेरच्या तासात अचानक चित्र पालटले आणि आश्चर्यरित्या शेअरबाजार तेजीसोबत बंद होताना दिसला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग तेजीत तर निफ्टीत 50 पैकी 25 समभाग तेजीत असताना दिसले. बँकिंग क्षेत्रातील 14 पैकी 8 समभागांमध्ये खरेदी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 100 अंकांनी वाढत 51548 अंकांवर सावरत बंद होताना दिसला.
हे समभाग तेजीत
बाजारात एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर्स, टीसीएस, हिंडाल्को, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, नेस्ले, टायटन, ट्रेंट, अपोलो हॉस्पिटल, डॉ. रे•िज लॅब्ज, भारती एअरटेल, कोटक बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी, इंडिगो, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स पीव्ही, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन टुब्रो, एसबीआय, एचयुएल, टाटा केमिकल, कोफोर्ज, पर्सिस्टंट सिस्टम्स, केपीआयटी टेक्नॉलॉजीस, पेज इंडस्ट्रिज यांचे समभाग मजबुतीसोबत बंद होताना दिसले.
हे समभाग घसरणीत
गुरुवारच्या सत्रात सिप्ला, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा आणि महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, कोल इंडिया, टाटा स्टील, रिलायन्स, एसबीआय लाइफ, पॉवरग्रिड कॉर्प, जियो फायनान्स, सनफार्मा, बजाज ऑटो, ग्रासिम, एचडीएफसी लाइफ, आयशर मोटर्स, मॅक्स हेल्थकेअर, इटर्नल, एशियन पेंटस्, एनटीपीसी, एसआरएफ, बायोकॉन, डिक्सन टेक्नॉलॉजी, एचपीसीएल, बाळकृष्ण इंडस्ट्रिज, जेएसडब्ल्यू इन्फ्रा यांचे समभाग घसरणीत राहिले होते.
क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, आयटी, मेटल व रियल्टी यांचे निर्देशांक मजबुतीसोबत बंद झाले तर ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, ऑईल व गॅस तसेच फार्मा यांचे निर्देशांक नकारात्मक कामगिरी करत बंद झाले.