For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रारंभी मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला

06:26 AM Apr 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रारंभी मोठ्या घसरणीनंतर  शेअर बाजार सावरला
Advertisement

सेन्सेक्स 702 अंकांनी निफ्टी निर्देशांक 207 अंकांनी घसरणीत, ऑटो व एफएमसीजी समभाग दबावात

Advertisement

 त. भा. वृत्तसंस्था

मुंबई : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये जागतिक नकारात्मकतेच्या कारणास्तव मोठी घसरण दिसून आली होती. दिवस अखेर मात्र शेअर बाजार सावरत बंद होताना दिसला. सेन्सेक्स 702 तर निफ्टी 207 अंकांनी घसरत बंद झाला. ऑटो आणि एफएमसीजी यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 702 अंकांनी घसरत 76847 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 207 अंकांनी घसरत 23842 अंकांवर बंद होताना दिसला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील 307 अंकाच्या घसरणीसोबत 55605 च्या स्तरावर बंद झाला होता. मिडकॅप व स्मॉल कॅप हे दोन्ही निर्देशांक घसरणीत होते. आयटी कंपन्यांचा समभाग असणाऱ्या निफ्टी आयटी निर्देशांक 360 अंकाच्या नुकसानीसोबत 30669 अंकांवर बंद झाला.

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांच्या सोमवारच्या कामगिरीकडे पाहता फक्त दोन निर्देशांक तेजीत राहिले होते. यामध्ये सीपीएसई आणि एनर्जी या दोन निर्देशांकांचा समावेश होता. नकारात्मक कामगिरीमध्ये ऑटो, कमोडीटीज, फायनान्सीयल, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल,  ऑईल अँड गॅस, फार्मा रियल्टी यांचे निर्देशांक होते. यातही एफएमसीजी निर्देशांक 623 अंकांनी घसरत 47570 च्या स्तरावर बंद होताना दिसला.

विविध समभागांची कामगिरी

एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय बँक, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी, टाटा मोटर्सपीव्ही, ओएनजीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, डॉ. रे•ाrज लॅब्ज, अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते.

बाजारातील आघाडीची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, लार्सन टूब्रो, कोटक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्युमर, एसबीआय, सिप्ला, विप्रो, इन्फोसिस, श्रीराम फायनान्स, टायटन, जिओ फायनान्स, अदानी पोर्ट, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती सुझुकी, इंडिगो, टीसीएस, नेस्ले, आयशर मोटर्स यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

Advertisement
Tags :

.