For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या दिवशी शेअर बाजारात परतली तेजी

06:23 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या दिवशी शेअर बाजारात परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 447 अंकांनी वधारला, मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांक तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. सेन्सेक्स 447 अंकांनी तर निफ्टी 150 अंकांनी वाढीसोबत बंद झाला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये पाहता ऑटो आणि एनर्जी निर्देशांक तसेच एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक तेजीत होते.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 447 अंकांनी वाढत 84929 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 150 अंकांनी वधारत 25966 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील तेजीवर स्वार होता तो अखेर 156 अंकांनी तेजी दाखवत 59069 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 26 समभागांमध्ये तेजी दिसून आली तर उर्वरित चार समभागांमध्ये विक्री दिसून आली. निफ्टीमध्ये पाहता 50 पैकी 43 समभागांमध्ये खरेदी पहायला मिळाली. बँक निफ्टी निर्देशांकात 12 पैकी 8 बँकांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले.

मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्का वाढीसोबत बंद झाले. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीत होते. डिफेन्स, रियल्टी, ऑटो समभागांची खरेदी पहायला मिळाली. पीएसई, फार्मा, ऑइल आणि गॅस निर्देशांक तेजी दाखवत बंद झाला. यासोबत इन्फ्रा आणि एनर्जी या निर्देशांकांनीदेखील तेजीसह बाजाराला आधार दिला. क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी पाहता निफ्टी ऑटो निर्देशांक 335 अंकांच्या वाढीसोबत 27657 अंकांवर बंद झाला तर एनर्जी निर्देशांक 332 अंकांच्या वाढीसोबत 34796 अंकांवर बंद झाला. सोबत एफएमसीजी निर्देशांकांनेही चमकदार कामगिरी करत 234 अंकांच्या वाढीसोबत 54781 अंकांवर बंद होण्यामध्ये यश मिळविले.

समभागांची कामगिरी पाहता निफ्टीत श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन, टाटा कंझ्युमर्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा हे सर्वाधिक तेजीत होते. तसेच श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स पीव्ही, पॉवरग्रीड कॉर्प, बीईएल आणि मॅक्स हेल्थकेअर, ट्रेंट, इटर्नल, विप्रो, ओएनजीसी, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, कोल इंडिया, अदानी पोर्ट, सिप्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभागसुद्धा तेजीत राहिले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे एचसीएल टेक, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि डॉ. रे•िज लॅब्ज यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते.

Advertisement
Tags :

.