For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेरच्या दिवशी शेअर बाजारात परतली तेजी

06:32 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेरच्या दिवशी शेअर बाजारात परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 266 अंकांनी तेजीत, एफएमसीजी निर्देशांक चमकला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक बाजारामध्ये तेजी व एफएमसीजी क्षेत्रातील समभागांची चमकदार कामगिरी या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 266 तर निफ्टी 50 अंकांनी वाढत बंद झाला.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 266 अंकांनी वधारत 83580 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 50 अंकांच्या वाढीसोबत 25693 अंकांवर बंद झाला. बँकेचा निफ्टी निर्देशांकसुद्धा 56 अंकांच्या तेजीसोबत 60120 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी मिडकॅप-50 निर्देशांक 61 अंकांनी घसरत 17023 व निफ्टी स्मॉलकॅप-100 45 अंकांनी घसरत 16389 वर बंद झाला. एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक 2 टक्के तेजीसमवेत बंद झाला. हा निर्देशांक 1151 अंकांनी वाढत 51882 अंकांवर बंद झाला. इतर निर्देशांकांमध्ये ऑटो, सीपीएसई, आयटी व फार्मा यांचे निर्देशांक घसरणीसोबत तर कमोडिटीज, एनर्जी, इन्फ्रा, फायनान्सीयल्स, मेटल, ऑईल आणि गॅस, रियल्टी यांचे निर्देशांक मात्र तेजी दाखवत बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 पैकी 13 समभागांमध्ये तेजी पहायला मिळाली. इतर 17 समभागांमध्ये मात्र घसरण पहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांकामध्ये 19 समभाग तेजीसोबत आणि 31 समभाग घसरणीसोबत कार्यरत होते.

वधारलेले समभाग

भारतीय शेअरबाजारात आयटीसी, कोटक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेलिकॉम क्षेत्रातील भारती एअरटेल, वित्त क्षेत्रातील बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व तसेच श्रीराम फायनान्स, हिंडाल्को, टायटन, लार्सन टूब्रो, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवर ग्रीड कॉर्प, एमआरएफ, आयडीबीआय बँक, भारती हेक्साकॉम, मुथ्थुट फायनान्स यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले.

Advertisement
Tags :

.