For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात तीन दिवसानंतर तेजी परतली

07:00 AM Sep 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात तीन दिवसानंतर तेजी परतली
Advertisement

सेन्सेक्स 138.36 तर निफ्टी 46.30 अंकांनी वधारले

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई  सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. दरम्यान मागील तीन सत्रांमधील घसरणीला पूर्णविराम देत बाजाराने तेजीची नोंद केल्याचे दिसून आले. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 138.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 74,902.59 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 46.30 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 23,477.80 वर बंद झाला आहे.  बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग, रिअल्टी आणि मीडिया स्टॉक्समध्ये झाली. तर मेटल आणि फार्मा स्टॉक्समध्ये घसरण नोंदवली गेली. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेले 26 शेअर्स घसरून बंद झाले आणि 24 शेअर्स वाढून बंद झाले.

Advertisement

निफ्टीमधील निर्देशांकात एचडीएफसी लाईफ, पॉवरग्रिड आणि ओएनजीसीच्या शेअर्सनी 1-2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. तर एचसीएल टेक आणि हिंडाल्कोचे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. एसबीआय सिक्युरिटीजचे फंडामेंटल रिसर्च प्रमुख सनी अग्रवाल म्हणाले की, गुरुवारी शेअर बाजार मर्यादित कक्षेत राहिला. क्लोजिंग ऑक्शन सत्रापूर्वी, निफ्टी 0.2 टक्क्यांनी घसरून 23,400 च्या खाली बंद झाला. मोठ्या संख्येने शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजाराचा एकूण कलही कमजोर राहिला.

पश्चिम आशियातील तणाव

पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 102 डॉलरच्या वर गेले. डॉलरच्या तुलनेत रुपया सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात कमकुवत झाला आणि 95.46 च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर बंद झाला. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर राहिल्याचे दिसून आले आहे.

बाजाराची नजर कुठे?

सनी अग्रवाल म्हणाले की, बाजाराचे लक्ष आता युरोपियन सेंट्रल बँकेच्या व्याजदर निर्णयावर आहे. सेंट्रल बँकेकडून व्याजदरात 0.25 टक्के वाढ अपेक्षित आहे. निकालाच्या आधी युरोपियन बाजारपेठांमध्ये व्यवहार सपाट सुरू आहेत. याशिवाय, अमेरिकेची ऑगस्ट महिन्याची उत्पादक महागाईची आकडेवारीही प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आहे.

  • पॉवरग्रिड कॉर्प    272
  • अॅक्सिस बँक       1260
  • अल्ट्राटेक सिमेंट  11053
  • एनटीपीसी          337
  • टेक महिंद्रा         1518
  • भारती एअरटेल   1837
  • एचडीएफसी बँक 694
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 3955
  • कोटक महिंद्रा     416
  • बजाज फायनान्स 1046
  • टायटन               5010
  • टीसीएस              2216
  • स्टेट बँक            1004
  • इटर्नल                 320
  • इंटरग्लोब एव्ही    4969
  • एसबीआय लाईफ 1701
  • सिप्ला                1380
  • श्रीराम फायनान्स 1038
  • हिरोमोटो           5280
  • पी.बी. फिनटेक   1803
  • कोलगेट            1810
  • अंबुजा सिमेंट      396

  • एचसीएल टेक     1196
  • टाटा स्टील         185
  • ट्रेन्ट                   2789
  • आयटीसी           259
  • भारत इले.          403
  • अदानी पोर्ट        1757
  • मारुती सुझुकी    12530
  • रिलायन्स इंडस्ट्रीज    1275
  • आयसीआयसीआय    1384
  • हेंदुस्थान युनि      1937
  • इन्फोसिस           1031
  • सनफार्मा            1864
  • बजाज फिनसर्व्ह  1924
  • एशियन पेन्ट्स     2480
  • महिंद्रा-महिंद्रा      3149
  • ब्रिटानिया           5011
  • मॅरिको                802
  • अपोलो हॉस्पिटल 8875
  • टीव्हीएस मोटर   4115
  • डिव्हीस लॅब        9405
  • लुपिन                2075
  • विप्रो                  166
  • श्री सिमेंट           22760
  • आयशर मोर्ट्स    7700
  • हिंडाल्को           1019
Advertisement
Tags :

.