For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरबाजाराने सुरुवातीची तेजी गमावली

06:54 AM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअरबाजाराने सुरुवातीची तेजी गमावली
Advertisement

सेन्सेक्स 64 अंकांनी वाढला तर निफ्टी 27 अंकांनी घसरला : आयटी, बँक, रियल्टी निर्देशांक दबावात

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 64 अंकांनी वाढत 73983 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांच्या घसरणीसोबत 23214 अंकांवर बंद झाला.

Advertisement

हे समभाग तेजीत

भारतीय शेअर बाजारात बुधवारी नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, मॅक्स हेल्थकेअर, पॉवरग्रिड कॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन टुब्रो, एशियन पेंटस्, डॉ. रे•िज लॅब्ज, आयशर मोटर्स, टाटा कंझ्युमर्स, एसबीआय, सिप्ला यांचे समभाग तेजीत होते. मिडकॅप निर्देशांकातील फॅक्ट, एमआरपीएल, टाटा टेक, एसआरएफ, कोलगेट, भारत फोर्ज यांचेही समभाग मजबूत होत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे घसरणीत इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, विप्रो, ग्रासिम, भारती एअरटेल, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, ओएनजीसी, इन्फोसिस, कोल इंडिया, हिंडाल्को, जियो फायनान्स, एचसीएल टेक, इटर्नल, एसबीआय लाइफ, टायटन, श्रीराम फायनान्स, बीईएल, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, एनटीपीसी यांचा समावेश होता. मिडकॅप निर्देशांकात ऑईल इंडिया, एनएलसी इंडिया, इंडियन बँक, कल्याण ज्वेलर्स, बंधन बँक या समभागांनी नुकसान झेललं होतं.

विविध क्षेत्रांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांचा कामगिरीचा विचार केल्यास दोन निर्देशांक तेजीत होते. यात निफ्टी फायनॅन्शीयल्स व एफएमसीजी यांचा समावेश होता. एफएमसीजी निर्देशांक 509 अंकांनी वाढत 48957 च्या स्तरावर बंद झाला. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक नुकसानीसह बंद झाले.

Advertisement
Tags :

.