शेअर बाजाराची अर्थसंकल्पावर नाराजी
सेन्सेक्स 280 अंकांनी प्रभावीत : सलग चौथ्या घसरणीची नोंद
मुंबई :
केंद्र सरकारने आपला आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. या अर्थसकंल्पात विविध घोषणा, नवनवीन तरतूदी करण्यात आल्या आहेत. तर काही नव्यानेही योजना लागू करण्याचा प्रयत्न पेंद्र सरकारने केल्याचे दिसून आले. यामध्ये मात्र शेअर बाजारात नाराजीचा सूर मंगळवारी राहिला होता. परंतु अंतिमक्षणी बाजार सावरल्याचे दिसून आले. हीच स्थिती बुधवारीही कायम राहिली असून यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.
बुधवारी सकाळी बाजार सुरु झाल्यापासून नरमाई होती. सायंकाळी बंद होईपर्यंत दोन्ही निर्देशांक घसरणीसोबतच बंद झाले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 280.16 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 80,148.88 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 65.55 अंकांनी घसरुन निर्देशांक 24,413.50 वर बंद झाला आहे.
भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात घसरण राहिली आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर म्हणजे 19 जुलैपासून बाजारात घसरण राहिली आहे. याचा परिणाम आणखीन काही दिवस बाजारात राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
मुख्य कंपन्यांमध्ये बाजारात बुधवारी निफ्टीमधील एचडीएफसी लाईफ, टेक महिंद्रा, भारत पेट्रोलियम, एनटीपीसी आणि टाटा मोर्ट्स यांचे मुख्य पाच समभाग हे वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सर्वाधिक घसरणीत राहिलेल्यात बजाज फिनसर्व्हचे समभाग राहिले आहेत. यासह तिमाही निकालाच्या नंतर काही कंपन्याच्या कामगिरीकडे बाजाराचे अधिकचे लक्ष आहे. तरीही बुधवारी टाटा कंझ्युमर, ब्रिटानिया, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.जागतिक तसेच देशातील विविध घडामोडींचा आगामी काळात सकारात्मक परिणाम राहिल्यास त्यांचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला होण्याचे संकेत आहेत.