For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक बाजारातील तेजीमुळे शेअरबाजारात तेजी

06:29 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक बाजारातील तेजीमुळे शेअरबाजारात तेजी
Advertisement

सेन्सेक्स 1372 अंकांनी वधारला : निफ्टी 399 अंकांनी तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाच दिवसांच्या विरामाच्या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात तेजी राहिली. भारतीय शेअरबाजारानेही मंगळवारी चांगली तेजी दाखवत बंद होण्यात यश मिळवले. इराणचे मोजतबा खामेनेई हे अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याच्या बातमीनंतर दुपारनंतरच्या सत्रात बाजारात तेजी दिसून आली.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1372 अंकांच्या मजबुतीसोबत 74068 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 399 अंकांनी वाढत 22912 अंकांवर बंद होताना दिसला. बँक निफ्टी निर्देशांकही 1167 अंकांच्या वाढीसोबत 52605 च्या स्तरावर बंद झाला होता. बँकिंग आणि ऑटो हे दोन निर्देशांक मंगळवारी प्रामुख्याने मोठ्या तेजीत होते, ज्याने बाजाराला तेजी राखण्यात मदत केली.

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता सर्वच क्षेत्रे तेजीसह बंद झाली.  बँकिंग आणि ऑटो यासोबत फायनॅन्शीयल्स 523 अंक, एफएमसीजी 571 अंक, आयटी 501 यांचीही कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली होती.

समभागांची कामगिरी

विविध समभागांची कामगिरी पाहता लार्सन टुब्रो, इंडिगो, इटर्नल, एशियन पेंटस्,  अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, जियो फायनान्स, टाटा कंझ्युमर, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, रिलायन्स, एचसीएल टेक, टीसीएस, एसबीआय लाइफ, ओएनजीसी, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, विप्रो, बीईएल, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्सपीव्ही, एचयुएल, बजाज ऑटो, ग्रासिम, ट्रेंट यांचे समभाग मजबूत होत बंद झाले. यांच्यासोबत मिडकॅपमध्ये पाहता एचपीसीएल, जीएमआर एअरपोर्टस, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, फॅक्ट, एचडीएफसी एएमसी यांचे समभागही तेजीत होते. तर दुसरीकडे कमकुवत समभागांमध्ये पाहता एसबीआय, सिप्ला, सनफार्मा, अदानी एंटरप्रायझेस, पॉवरग्रिड कॉर्प, कोल इंडिया यांचा समावेश राहिला होता.

दुपारी 1 वाजता मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवल्याचे सांगण्यात आले. परंतु इराणकडून त्याबाबत खुलासा करण्यात आला नाही. जागतिक बाजारात तेजीचा फायदा भारतीय शेअरबाजाराने उठवला. 5 दिवसांसाठी ऊर्जा स्त्रोतांवरचे इराणवरील हल्ले थांबवण्याचे ट्रम्प यांचे आश्वासनही बाजाराला आधार देणारे ठरले.

Advertisement
Tags :

.