For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक दबावात शेअरबाजार घसरणीत

06:58 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक दबावात शेअरबाजार घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 324 अंकांनी घसरणीत, आयटी समभाग दबावात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारामध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 324 अंकांनी घसरला होता. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 324 अंकांनी घसरत 83246 च्या स्तरावर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 108 अंकांनी घसरत 25585 अंकांवर बंद झाला. सोबत आयटी निर्देशांक 184 अंकांनी पडत  38902 अंकांवर आणि बँक निफ्टी निर्देशांक 203 अंकांनी घसरत 58891 अंकांवर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक 171 अंकांनी घसरत 17190 अंकांवर बंद झाला.

Advertisement

समभागांची कामगिरी

शेअरबाजारात सोमवारी टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, आयटीसी, इंटरग्लोब एव्हिएशन, ट्रेंट, श्रीराम फायनान्स, बीईएल, एचडीएफसी लाईफ, हिंडाल्को, सनफार्मा, लार्सन टूब्रो, आयशर मोटर्स यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात जेएसडब्ल्यू इन्फ्रा, सीजी पॉवर, पॉलिकॅब, पीबी फिनटेक, बँक ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान झिंक यांनीही तेजी राखलेली पहायला मिळाली. दुसरीकडे घसरणीमध्ये पाहता दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इटर्नल, मॅक्स हेल्थकेअर, भारती एअरटेल, महिंद्रा आणि महिंद्रा, टायटन, अदानी पोर्ट, जीओ फायनान्सीयल, टीसीएस, अपोलो हॉस्पिटल, ग्रासीम, एनटीपीसी, ओनजीसी, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग घसरणीत राहिले होते. मिडकॅप निर्देशांकमध्ये आयडीबीआय बँक, एमआरपीएल, गोदरेज प्रॉपर्टीज, एस. बँक, बीएसई लिमीटेड आणि भारत फोर्ज या समभागांनी निराशादायी कामगिरी केली.  विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास बरेचसे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले.

Advertisement
Tags :

.