महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजाराची झेप आता नव्या उच्चांकावर!

07:01 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बीएसई निर्देशांक 71 हजारांवर

Advertisement

 वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मोठी वाढ झाली आहे. आयटी समभागातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची तर निफ्टीमध्ये 300 अंकांची वाढ दिसून आली. हे सर्वात मोठ्या आयटी निर्देशांकात दिसून आले आहे. आज बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 970 अंकांच्या उसळीसह 71,484 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 274 अंकांच्या उसळीसह 21,457 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील मोठ्या उसळीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे. दिवसभरात आयटी समभागांमधील खरेदीमुळे बाजारात जबरदस्त तेजी आल्याचे दिसून आले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 39 समभाग वाढीसह आणि 11 घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग वाढीसह आणि 8 समभाग घसरणीसह बंद झाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article