For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात निराशादायीच

06:53 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात निराशादायीच
Advertisement

सेन्सेक्स 345 अंकांनी घसरणीत : चौथे सत्र दबावात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवड्याची सोमवारची सुरुवात भारतीय शेअरबाजारासाठी निराशादायी ठरली आहे. सेन्सेक्स, निफ्टी दोन्ही निर्देशांक दबावात दिसून आले. भारतीय शेअरबाजार सलग चौथ्या सत्रात कमकुवत दिसून आला आहे. विविध क्षेत्राच्या निर्देशांकाचा विचार करता एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक तेजीत राहिला होता.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 345 अंकांनी घटत 84695 च्या स्तरावर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 100 अंकांनी घसरुन 25942 अंकांवर बंद झाला होता.

हे समभाग तेजीत

सोमवारी विविध समभागांच्या कामगिरीकडे पाहता टाटा स्टील, एशियन पेंटस्, ग्रासिम, नेस्ले इंडिया, एनटीपीसी व टाटा कंझ्युमर यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडिगो, बजाज ऑटो, ओएनजीसी, इटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा अॅक्सिस बँक यांचे समभाग तसेच मिडकॅप निर्देशांकातील एनएलसी इंडिया, हुडको, सुंदरम फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, सेल, एचपीसीएल यांचे समभागदेखील मजबुतीसोबत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे घसरणीचा विचार करता अदानी पोर्टस्, पॉवरग्रिड कॉर्प, एचसीएल टेक, ट्रेंट, बीईएल व अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत होते. यासोबत टाटा मोटर्स पीव्ही, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा, टीसीएस, रिलायन्स, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, भारती एअरटेल, मॅक्स हेल्थकेअर, हिंडाल्को, विप्रो, कोल इंडिया, जियो फायनॅन्शीयल तसेच मिडकॅमधील आरव्हीएनएल, डिक्सन टेक्नॉलॉजी, हिंदुस्थान झिंक, अपोलो टायर्स यांचेही समभाग घसरलेले होते.

क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध निर्देशांकांची कामगिरी पाहता एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक अल्पशा तेजीसोबत बंद झाला होता.

Advertisement
Tags :

.