For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात सलग दुसरे सत्र घसरणीत

06:21 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात सलग दुसरे सत्र घसरणीत
Advertisement

बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 319 तर निफ्टी 86 अंकांनी प्रभावीत

Advertisement

मुंबई :

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात बुधवारी घसरणीची नोंद करण्यात आली आहे. या अगोदच्या सत्रात म्हणजे मंगळवारी भारतीय बाजार नुकसानीत राहिला होता. मुख्य कंपन्यांसह दुसऱ्या तिमाहीचे अहवाला आता समोर येत आहेत. यामध्ये काहीशी निराशाजनक स्थिती असल्याचा नकारात्मक परिणाम हा भारतीय बाजारात दिसून येत आहे.

Advertisement

विदेशी गुंतवणूकदारांनी देशातील बाजारामधून पैसा काढून घेण्यास सुरुवात झाल्याने बाजारामध्ये दबावाची स्थिती राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांमध्ये घसरणीची नोंद करण्यात आली आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 318.76 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 0.39 टक्क्यांसोबत 81,501.36 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला एनएसई निफ्टी दिवसअखेर 86.05 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 24,971.30 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.87 टक्क्यांनी प्रभावीत राहिला आहे. यासोबतच अदानी पोटर्स, इन्फोसिस, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, कोटक बँक, आयटीसी, टायटन, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक0.92 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, स्टेट बँक यांचे समभाग वधारले आहेत.

का आली घसरण?

जागतिक बाजारांमध्ये नकारात्मक कल राहिल्याचा दणका भारतीय बाजाराला बसला आहे. दरम्यान, आयटी व वाहन कंपन्यांच्या समभागामध्ये मोठी पडझड झाली आहे. तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतल्याच्या कारणास्तव भारतीय बाजारात घसरण राहिली आहे. दरम्यानच्या काळात विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी तब्बल 1,748.71 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री झाली आहे.

आता महाराष्ट्र व झारखंड या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता ही दोन्ही राज्यांमधील निवडणूक व त्यावर आधारीत असणारी देशातील राजकारणाची दिशा. तसेच जागतिक पातळीवरील राजकीय स्थितींचाही सकारात्मक व नकारात्मक परिणाम आगामी काळात शेअर  बाजारात दिसून येणार आहे. यामुळे आता बाजारात कोणता कल राहतो हे पहाणे महत्वाचे ठरणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.