For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरुवारी शेअरबाजारात 823 अंकांची घसरण

07:00 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुरुवारी शेअरबाजारात 823 अंकांची घसरण
Advertisement

ऑटो, आयटी निर्देशांक दबावात : पेटीएम मोठ्या घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

तेजीवर स्वार असणारा भारतीय शेअरबाजार गुरुवारी घसरणीसोबत बंद झाला आहे. सेन्सेक्स 823 अंकांनी घसरणीसोबत बंद झाला. आयटी, एफएमसीजी, मेटल व ऑटो निर्देशांकाच्या नकारात्मक कामगिरीमुळे शेअरबाजारात गुरुवारी दबाव दिसून आला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 823 अंकांच्या घसरणीसोबत 81691 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 253 अंकांनी घसरुन 24888 च्या स्तरावर बंद झाला आहे. जागतिक बाजारात पाहता अमेरिकेतील आणि युरोपातील बाजार घसरणीत होते.

Advertisement

समभागांच्या कामगिरीकडे पाहता पेटीएम 7 टक्के, एचपीसीएल 5.8 टक्के, बीएसई लिमिटेड 4.42 टक्के, इरीडा 3.90 टक्के, जीएमआर एअरपोर्ट 3.49 टक्के इतके घसरणीत होते. यासोबत हिंडाल्को, आयशर मोटर्स, अदानी पोर्टस, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, टाटा कंझ्युमर्स, आयटीसी, लार्सन टुब्रो, टाटा मोटर्स, जियो फायनॅन्शीयल, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प यांचेही समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत. अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंटस्, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय कार्ड, ऑइल इंडिया, मॅनकाइंड, विप्रो, ओएनजीसी, डॉ. रे•िज लॅब्ज, टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र तेजी राखत बंद झाले. निफ्टीतील 50 पैकी 43 समभाग घसरणीसोबत बंद झाल्याचे कळते.

सेन्सेक्समधील 50 पैकी 27 समभाग घसरणीत होते. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकही जवळपास अनुक्रमे 1.6 टक्के, 1.78 टक्के नुकसानीसह बंद झाले. याखेरीज सर्व क्षेत्रांचे निर्देशांकही घसरणीत होते. रियल्टी 2 टक्के व मेटल निर्देशांक 1.5 टक्के घसरणीत होता. निफ्टी बँक निर्देशांक 377 अंकांनी घसरुन 56082 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारात अमेरिका आणि युरोपातील बाजारात दबाव दिसून आला. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 265 अंकांनी, एस अँड पी 500 16 अंकांनी घसरणीत होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

? अपोलो हॉस्पिटल          6996

? डॉ. रे•िज लॅब्ज           1362

? बजाज फिनसर्व्ह           2028

? एशियन पेंटस्   2219

? टेक महिंद्रा      1644

? विप्रो   259

? ओएनजीसी      247

समभाग घसरलेल्या कंपन्या

? टाटा मोटर्स      715

? श्रीराम फायनान्स          668

? ट्रेंट     5627

? टायटन            3452

? कोल इंडिया     392

? टाटा स्टील       152

? लार्सन टुब्रो       3603

? जियो फायनॅन्शीयल       296

? पॉवरग्रिड कॉर्प 289

? इटर्नल 251

? महिंद्रा आणि महिंद्रा      3019

? एसबीआय लाइफ          1766

? एचयुएल          2332

? टाटा कंझ्यु.      1085

? बजाज ऑटो     8567

? अॅक्सिस बँक    1212

? अदानी एंटरप्रायझेस      2543

? भारत इले.       387

? नेस्ले   2385

? इन्फोसिस        1608

? एनटीपीसी       333

? एचडीएफसी लाइफ       754

? सिप्ला 1502

? अल्ट्राटेक सिमेंट           11323

? ग्रासिम            2689

? आयटीसी         421

? एचसीएल टेक  1701

? जेएसडब्ल्यू स्टील          995

? एसबीआय        805

? टीसीएस          3434

? हिरो मोटोकॉर्प 4362

? भारती एअरटेल            1844

? कोटक महिंद्रा  2126

? इंडसइंड बँक   829

Advertisement
Tags :

.