For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या सत्रात शेअरबाजार ३२९ अंकांनी घसरला

06:54 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या सत्रात शेअरबाजार  ३२९ अंकांनी घसरला
Advertisement

पश्चिम आशियातील तणावासह अन्य घडामोडींचा बाजारावर परिणाम : निफ्टीही प्रभावीत होत बंद

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. मागील एक-दोन दिवसांपासून देशांतर्गत शेअर बाजाराचा कल सुधारत होता आणि यामुळे बाजारात वेगाने वाढ दिसून येत होती. परंतु पुन्हा एकदा बाजारात नकारात्मक कल राहिल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले.

Advertisement

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 329.91 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 74,529.07 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 85.30 अंकांनी घसरुन निर्देशांक 23,329.00 वर बंद झाला आहे. दरम्यान निफ्टीतील 50 समभागांपैकी 15 समभाग तेजीसह बंद झाले असून 35 समभागांमध्ये घसरण झाली आहे.

जागतिक घडमोडींपैकी पश्चिम आशियातील सध्याची तणावाची स्थिती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री यांचा प्रभाव हा भारतीय बाजारांमध्ये होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत आहे. सलग 4 दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात जोरदार विक्री नोंदवली गेली.

एसबीआय सिक्युरिटीजचे फंडामेंटल रिसर्च प्रमुख सनी अग्रवाल म्हणाले की, साप्ताहिक एक्स्पायरी दरम्यानच्या अस्थिर व्यवहारानंतर निफ्टी घसरणीसह बंद झाला. निफ्टीने 23,286 चा इंट्रा-डे नीचांक गाठल्याने आयटी स्टॉक्स घसरणीच्या पातळीवरून सावरले. तथापि, व्यवसायावर एआयच्या परिणामाबद्दल चिंता पुन्हा वाढल्याने आयटी निर्देशांक 1 टक्क्याने घसरून बंद झाला.

क्लोजिंग ऑक्शनपूर्वी निफ्टी-50 0.3 टक्क्यांनी खाली

होर्मुझच्या समुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य करार होण्याच्या बातमीनंतर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री(मंगळवारी) संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील. त्याच वेळी, डाऊ फ्युचर्समध्ये सुमारे 120 अंकांची वाढ दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.