महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजार 1400 अंकांनी कोसळला

07:00 AM May 20, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टीतही घसरण : गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

शेअर बाजारामध्ये गुरुवारी मोठय़ा प्रमाणात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. जागतिक नकारात्मक संकेताच्या कारणास्तव भारतीय शेअर बाजार गुरुवारी कोसळलेला पहायला मिळाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक गुरुवारी सरतेशेवटी 1416 अंकांच्या घसरणीसह 52,792.23 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 430 अंकांच्या घसरणीसह 15,809.40 अंकांवर बंद झाला. गुंतवणूकदारांचे या महिन्यात एकंदर 16 लाख कोटी रुपये बुडाले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. वाढती महागाई, रशिया-युपेन यांच्यातील सुरू असलेले युद्ध, जगभरामध्ये पुरवठा साखळीत येणाऱया अडचणी, कोरोनाचे वाढते प्रमाण, चीनमध्ये लॉकडाऊन अशा बऱयाच गोष्टींचा प्रभाव शेअर बाजारावर नकारात्मक दिसून आला. इंग्लंड आणि अमेरिकेतील महागाईही चार दशकानंतर मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसले आहे. यातून बाजारामध्ये विक्रीवर गुंतवणूकदारांनी जोर दिला होता.

4 हजार अंकांची घसरण

मे मध्ये सेन्सेक्स जवळपास 4000 अंकांनी घसरलेला दिसला. 29 एप्रिल 2022 रोजी सेन्सेक्स 57,061 अंकांवर बंद झाला होता. एकंदर मे महिन्यामध्ये 4000 अंकांनी सेन्सेक्समध्ये घसरण दिसली आहे. धातू आणि आयटी क्षेत्राशी संबंधित क्षेत्रामध्ये गुरुवारी मोठी घसरण दिसली. सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि विप्रो यांच्या समभाग घसरलेले दिसले. पण दुसरीकडे आयटीसीच्या समभागाने मात्र कमालीची तेजी प्राप्त केली होती. तीन वर्षानंतर समभागाचा भाव वधारलेला दिसला. बीएसईवर सदरचा समभाग 276 रुपयांवर व्यवहार करत होता. निफ्टीतील 11 क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत होते. आयटी निर्देशांक सर्वाधिक 5.74 टक्के इतका नुकसानीत होता.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article