युद्धाच्या तणावात शेअरबाजार सोमवारी कोसळला
सेन्सेक्स 1836 अंकांनी पडझडीत, निफ्टीतही मोठी घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिका-इराण यांच्यातील संबंधांमध्ये वाढलेला ताण, जागतिक बाजारातील दबाव, तेलाच्या किमतीत वाढ यासाऱ्याचा परिणाम शेअरबाजारावर दिसून आला. सेन्सेक्स व निफ्टी मोठ्या प्रमाणात घसरले होते.
मुंबई शेअरबाजारात सोमवारी मोठी घसरण अनुभवायला मिळाली. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1836 अंकांनी कोसळत 72696 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 601 अंकांनी घसरुन 22512 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकही 1989 अंकांनी घसरत 51437 अंकांवर बंद झाला होता.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांमध्ये पाहता सर्वच निर्देशांक सोमवारी नुकसानीसह बंद झाले होते. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी हे सर्व निर्देशांक घसरणीत होते. यातही सर्वाधिक घसरणीत एफएमसीजी 1170 अंकांनी व एनर्जी 1068 अंकांनी राहिला होता. यापाठोपाठ फायनॅन्शीयल्स 821 अंकांनी तर ऑटो 781 अंकांनी घसरणीत राहिला होता.
हे समभाग वधारले
याचदरम्यान शेअरबाजारात एचसीएल टेक, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस, ओएनजीसी यांचे समभाग मात्र तेजीत होते.
हे समभाग घसरले
टीसीएस, रिलायन्स, मॅक्स हेल्थकेअर, सनफार्मा, विप्रो, एचयुएल, नेस्ले, एनटीपीसी, कोल इंडिया, अॅक्सिस बँक, आयशर मोटसं, ग्रासिम, आयटीसी, बीईएल, टाटा स्टील, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, इटर्नल, टाटा मोटर्स पीव्ही, भारती एअरटेल, डॉ. रे•िज लॅब्ज, बजाज ऑटो, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाइफ, टेंट, टायटन, इंडिगो यांचे समभाग घसरले होते. तर मिडकॅपमध्ये सेल, भारत डायनॅमीक्स, जीएमआर एअरपोर्टस्, पेट्रोनेट एलएनजी, बंधन बँक यांचेही समभाग नुकसानीसह बंद झाले.