शेअर बाजार सलग 12 व्या दिवशीही तेजीत
औषध कंपन्यांच्या समभागांमुळे सेन्सेक्स-निफ्टी उत्साहात
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. इंट्रा डे च्या व्यवहारादरम्यान सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी निफ्टीने नवा विक्रम नोंदवला तर सेन्सेक्सही त्यांच्या मजबूतीसोबत घोडदौड करत बंद झाल्याचे दिसून आले. भारतीय बाजाराने सलग 12 व्या दिवशी आपला तेजीचा प्रवास कायम ठेवला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 231.16 अंकांनी वधारुन निर्देशांक 82,365.77 वर बंद झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 83.95 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,235.90 मजबूत राहिला आहे.
शुक्रवारी सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 22 समभाग आणि निफ्टीमधील 50 समभागांमध्ये 41 समभाग हे वधारले आहेत. अभ्यासकांच्या अंदाजानुसार जागतिक बाजार यावेळी सप्टेंबरमधील अमेरिकन फेडकडून होणाऱ्या व्याजदर कपातीची वाट बघत आहे. कारण व्याजदर कपातीनंतरच गुंतवणूकदारांचा कल व विविध क्षेत्रांची स्थिती यांच्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचेही सांगितले जात आहे. ऑगस्ट महिन्यात मजबूत असे अमेरिकन आर्थिक आकडे व फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेलसह फेडच्या अन्य अधिकाऱ्यांच्या नरमाईच्या टीप्पणीमुळे विकासासंबंधी चिंता कमी झाली आहे. यासह अन्य कारणांमुळे भारतीय इक्विटीसारखे उभारणारे बाजार विदेशी गुंतवणूक वाढविण्यास चालना देण्याची शक्यता अधिक आहे.
बाजारात एनएसईवर सर्वाधिक चांगली कामगिरी दिसून आली औषध कंपनी सिप्लाची, त्या पाठोपाठ बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, डिव्हीस लॅब आणि एनटीपीसी यांचा नंबर लागतो. या प्रमाणे बीएसई बजाज फायनान्स सर्वाधिक तेजीत राहिले. यात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजीत होते. अन्य कंपन्यांमध्ये एनएसईमध्ये टाटा मोटर्स सर्वाधिक घसरणीत राहिले. दरम्यान वाहक कंपन्या, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, कोल इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नुकसानीत राहिले. तसेच बीएसईत टाटा मोटर्स, रिलायन्स, टेक महिंद्रा, आयटीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया व मारुती सुझुकी यांच्यासह टाटा स्टील हे समभाग प्रभावीत राहिले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज फायनान्स 7206
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2806
- एनटीपीसी 416
- बजाज फिनसर्व्ह 1782
- भारती एअरटेल 1588
- पॉवरग्रिड कॉर्प 337
- सनफार्मा 1821
- टीसीएस 4551
- इन्फोसिस 1949
- टायटन 3562
- आयसीआयसीआय 1230
- इंडसइंड बँक 1426
- अल्ट्राटेक सिमेंट 11291
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3704
- एशियन पेन्ट्स 3134
- अॅक्सिस बँक 1177
- कोटक महिंद्रा 1780
- स्टेट बँक 815
- जेएसडब्लू स्टील 940
- हिंदुस्थान युनि 2784
- एचसीएल टेक 1752
- युपीएल 598
- कोलगेट 3653
- अपोलो हॉस्टिपल 6940
- कमिन्स 3754
- अदानी पोर्ट 1482
- ब्रिटानिया 5854
- एसबीआय लाईफ 1848
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टाटा मोटर्स 1109
- रिलायन्स इंडस्ट्रीज 3019
- टेक महिंद्रा 1635
- आयटीसी 501
- एचडीएफसी बँक 1632
- नेस्ले 2497
- मारुती सुझुकी 12421
- टाटा स्टील 152
- विप्रो 538
- डाबर इंडिया 637
- कोल इंडिया 525
- मॅक्स हेल्थकेअर 864
- हॅवेल्स इंडिया 1892