मंगळवारी शेअरबाजार अल्पशा तेजीसोबत बंद
सेन्सेक्स 173 अंकांनी वधारला : आयटीत परतली तेजी
मुंबई :
आशियाई बाजारातील मिळत्याजुळत्या कलासोबत भारतीय शेअर बाजार मंगळवारी काहीशा तेजीसोबत बंद झाला होता. यायोगे दुसऱ्या सत्रात बाजार तेजीत राहिला होता. आयटी समभागांमध्ये पुन्हा खरेदीचा कल दिसून आला.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 173 अंकांनी वधारत 83450 अंकांवर बंद झाला असून राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 42 अंकांनी वधारत 25725 अंकांवर बंद झालेला दिसून आला. बँक निफ्टी निर्देशांक 224 अंकांनी वर चढत 61174 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला. निफ्टी आयटी निर्देशांकही काहीसा सावरत व्यवहार करताना दिसला. सरतेशेवटी 337 अंकांनी वधारत 33075 अंकांवर आयटी निर्देशांक बंद झाला.
विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास काहीसा मिश्र कल दिसून आला. मोठी तेजी कोणत्याच निर्देशांकात मंगळवारी नव्हती. ऑटो, सीपीएसई, इन्फ्रा, एफएमसीजी, फार्मा यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले तर दुसरीकडे कमोडिटीज, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, मेटल, ऑईल अँड गॅस, रियल्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले होते.
समभागांची कामगिरी
मंगळवारी अदानी एंटरप्रायझेस, आयटीसी, बीईएल, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्टस्, एशियन पेंटस्, विप्रो, टीसीएस, एसबीआय, आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, मॅक्स हेल्थकेअर, इंडिगो, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाइफ, पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स पीव्ही, टायटन, डॉ. रे•िज लॅब्ज यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे मिडकॅपमधील वन 97 कम्यु.(पेटीएम), एम अँड एम फायनॅन्शीयल, डिलीव्हरी, कोचीन शिपयार्ड, एमआरपीएल, इंडियन बँक यांचे समभागदेखील तेजी दाखवत बंद झाले होते.
हे समभाग घसरले
शेअर बाजारात हिंडाल्को, टेंट, श्रीराम फायनान्स, इटर्नल, टाटा स्टील, रिलायन्स, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह व आयसीआयसीआय बँक यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले. याचप्रमाणे मिडकॅप निर्देशांकातील एसआरएफ, बीएसई लिमिटेड, हिंदुस्थान झिंक, सुंदरम फायनान्स, एनएमडीसी, ट्युब इन्वेस्टमेंटस् यांचे समभागही नकारात्मकतेत बंद झाले.