महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजार अल्पशा घसरणीसोबत बंद

06:20 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 166 अंकांनी घसरला, एचडीएफसी लाइफ नुकसानीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर मंगळवारी शेअरबाजार सावरताना दिसला. सरतेशेवटी शेअरबाजार काहीशा घसरणीसह बंद झाला. ब्रिटानियाचे समभाग वधारलेले होते तर एचडीएफसी लाइफचे समभाग मात्र चांगलेच घसरणीत होते.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 166 अंकांच्या घसरणीसोबत 78593 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 63 अंकांनी घसरुन 23992 या स्तरावर सावरत बंद झाला. सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 222 अंकांच्या तेजीसह 78981 अंकांवर तर निफ्टी 134 अंकांनी वधारत 24189 अंकांवर खुला झाला होता. सोमवार हा गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने ब्लॅक मंडेच ठरला. बँक निफ्टी वरच्या स्तरावरुन 1 हजार अंकांनी घसरला. निफ्टी ऑटो निर्देशांक 0.75 टक्के घसरणीसह बंद झाला होता. मंगळवारी जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, एल अँड टी, एचसीएल टेक, एनटीपीसी यांचे समभाग चांगल्या तेजीसह बाजारात व्यवहार करत होते.

तर एनएसईवर केपीआर मिल, बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस, नेटवर्क 18 मीडिया यांचे समभागही तेजीत होते. महिंद्रा आणि महिंद्रा, भारती एअरटेल, टायटन, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहिल्यास सार्वजनिक बँक, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो या क्षेत्रात सर्वात अधिक घसरण होती तर दुसऱ्या बाजुला निफ्टी रियल्टी, आयटी, मेटल या क्षेत्रांचे निर्देशांक मात्र मजबुतीसोबत बंद झाले होते.

शुक्रवारी अमेरिकेतील विकासाच्या अहवालाने चिंता वाढवली. अमेरिकेत मंदीची शक्यता वाढल्याचे वृत्त पसरताच त्याचा परिणाम सोमवारी विविध जागतिक बाजारांवर पहायला मिळाला. मंगळवारी युरोपातील बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात निक्केई 3217 अंकांनी वाढत व्यवहार करत होता. तर हँगसेंग 51 अंकांनी घसरणीत आणि कोस्पी 80 अंक व शांघाई कम्पोझीट 6 अंकांनी वधारत व्यवहार करत होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#business#social media
Next Article