For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारी शेअर बाजार सपाट स्तरावर बंद

06:57 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारी शेअर बाजार सपाट स्तरावर बंद
Advertisement

सेन्सेक्स घसरणीत तर निफ्टी अल्पशा तेजीत

Advertisement

मुंबई :

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात दिवसभरात चढउतार पाहायला मिळाला. आयटी, फार्मा आणि बँकिंग समभागांच्या विक्रीवर गुंतवणूकदारांनी भर दिला होता. सरतेशेवटी सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक सपाट स्तरावर बंद झाला.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 42 अंकांनी घसरत 85524 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 4 अंक वाढत 26177 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 4 अंक किरकोळ घसरत 59299 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक 314 अंकांनी नुकसानीसह 39173 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले तर निफ्टीत पाहता 50 पैकी 26 समभागांची कामगिरी कमकुवत दिसून आली. बँक निफ्टीत पाहता 12 पैकी 10 बँकांचे समभाग घसरणीत राहिले. आयटी, पीएसयु बँक, फार्मा समभागांमध्ये दबाव होता. रियल्टीसुद्धा अल्पसा घसरणीत होता तर मिडकॅप 1 अंकांनी वधारत 60816 अंकांवर बंद झाला.

समभागांची कामगिरी

निफ्टीत पाहता कोल इंडिया, श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टाटा मोटर्स पीव्ही व टाटा स्टील यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. याव्यतिरीक्त एनटीपीसी, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, आयशर मोटर्स, इंडिगो, एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील, एचयुएल, अपोलो हॉस्पिटल, बजाज फायनान्स, एसबीआय लाइफ यांनीही बाजाराला तेजीसह आधार दिला. इन्फोसिस, भारती एअरटेल, अदानी पोर्टस्, टेक महिंद्रा, इटर्नल व सिप्ला यांचे समभाग घसरणीत होते. तसेच टायटन, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, विप्रो, एसबीआय, रिलायन्स, भारती एअरटेल, इन्फोसिस, जियो फायनॅन्शीयल्स, नेस्ले इंडिया यांचेही समभाग घसरणीसोबत बंद झाले होते.

जागतिक बाजारात तेजी

जागतिक बाजारात पाहता आशियाई बाजारात कोरीयाचा कोस्पी 0.28 टक्के तेजीसह 4117 वर तर जपानचा निक्केई 0.021 अंकांच्या तेजीसह 50413 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.11 टक्के घसरत 25774 वर तर चीनचा शांघाय कंपोझीट 0.067 टक्के वाढत 3920 वर बंद झाला. 22 डिसेंबर रोजी अमेरिकेतील बाजारात डोव्ह जोन्स 0.47 टक्के वाढला होता तर नॅसडॅक कंपोझीट 0.52 टक्के व एस अँड पी-500 निर्देशांक 0.64 टक्के तेजीत होता.

Advertisement
Tags :

.