For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारी शेअरबाजार सपाट स्तरावर बंद

06:58 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारी शेअरबाजार सपाट स्तरावर बंद
Advertisement

सेन्सेक्स 20 अंकांनी घसरला: बँक निर्देशांक तेजीत

Advertisement

मुंबई :

आशियाई बाजारातील नकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार मंगळवारी सपाट स्तरावर बंद झाला. दिवसभरामध्ये शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. सरकारी बँक, धातू आणि ऑटो समभागांमध्ये खरेदी पाहायला मिळाली.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 20 अंकांनी घसरत 84,675 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 3 अंकांनी घसरून 25,938 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक मात्र 238 अंकांच्या तेजीसह 59,171 च्या स्तरावर बंद होण्यामध्ये यशस्वी झाला. सकाळी बीएसई सेन्सेक्स 100 अंकांनी घसरून 84600 अंकांवर खुला झाला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक सुद्धा 25 940 अंकांवर घसरणीसह खुला झाला होता.

समभागांची कामगिरी

सेन्सेक्समध्ये पाहता इटर्नल, इन्फोसिस, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले होते. महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग मात्र तेजीसमवेत बंद होताना दिसले. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीत होते तर निफ्टीमधील 50 पैकी 31 समभाग दबावासोबत बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांकातील 12 पैकी 9 बँका तेजीमध्ये राहिल्या होत्या.

क्षेत्रांची कामगिरी

निफ्टी मिडकॅप-100 आणि निफ्टी स्मॉल कॅप-100 निर्देशांक अनुक्रमे 0.15 टक्के आणि 0.28 टक्के घसरणीत राहिला होता. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांचा विचार करता रियल्टी, आयटी आणि फार्मा या क्षेत्रांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले होते. दुसऱ्या बाजूला पाहता निफ्टी पीएसयु बँक, धातू आणि ऑटो निर्देशांक अनुक्रमे 1.69 टक्के, 2.03 टक्के आणि 1.08 टक्के तेजीसमवेत बंद झाले.

जागतिक बाजारामध्ये पाहता आशियाई बाजारात दबाव पाहायला मिळाला. चिनी कंपनी एनव्हीडीयाचे समभाग एक टक्का घसरणीत राहिले होते. जपानचा निक्केई निर्देशांक 0.49 टक्के घसरणीत राहिला होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.41 टक्के घसरला होता.

Advertisement
Tags :

.