For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरच प्रदेशाध्यक्षाची निवड : तानावडे

11:22 AM Jan 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरच प्रदेशाध्यक्षाची निवड   तानावडे
Advertisement

दोन्ही जिल्हाध्यक्षांसाठी 11 जानेवारीला निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत

Advertisement

पणजी : येत्या 11 जानेवारी रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतरच भाजप प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची तारीख ठरविण्यात येणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पणजीतील भाजप कार्यालयात काल सोमवारी गाभा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत जिल्हा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी भाजप खासदार आणि सरचिटणीस अऊण सिंह यांची निवड करण्यात आली.

प्रदेश भाजपच्या दोन्ही जिल्हाध्यक्षपदांसाठी 10 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून 11 रोजी जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक बिनविरोध होईल, असे तानावडे म्हणाले. उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष पदासाठी दयानंद कार्बोटकार, ऊपेश कामत आणि राजसिंह राणे यांचे नाव पुढे आहे. दक्षिण गोव्यातून प्रभाकर गावकर, दीपक नाईक आणि शर्मद पै रायतूरकर यांचे नाव पुढे आहे. कमीतकमी तीन नावे केंद्राकडे पाठवली जाणार असून यातून एक नाव निश्चित केले जाणार, असे तानावडे म्हणाले.

Advertisement

प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुकांची राष्ट्रीय सरचिटणीसांशी चर्चा

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र सावईकर, दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, दयानंद सोपटे, दामू नाईक आणि गोविंद पर्वतकर यांनी राष्ट्रीय सरचिटणीस अऊण सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. 15 जानेवारीपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.