राज्य पोलीस दलाला अच्छे दिनाची अपेक्षा !
इतिहासाच्या पटलावर घडलेल्या घटना डोळ्यासमोर ठेऊन वर्तमान आणि भविष्यात कसे वागायचे हे प्रत्येकाला शिकता येते. अगदी त्याप्रकारे गेल्या वर्षभरात काय कमावले? काय गमावले? याचा विचार न करता पुढे काय मिळविणार आहे, याची योग्य ऊपरेषा आखली तर राज्य पोलीस दलाला नक्कीच अच्छे दिन येतील. ते अच्छे दिन आणण्याची अपेक्षा नवीन वर्षात येणाऱ्या नवीन पोलीस महासंचालकांवर निश्चितच असणार.
सरत्या वर्षाला निरोप देत असताना राज्यातील पोलीस दलाने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बऱ्यापैकी पेलली आहे. 2025 वर्ष हे पोलीस दलासाठी मोठे धामधुमीचे आणि पळापळीचे गेले आहे. कारण राज्यात महायुतीचे सरकार येऊन अगदी दोन महिने देखील झाले नसतील. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्याने पोलीस दलात पुन्हा एकदा आधुनिकतेची क्रांती होण्यास सुऊवात झाली होती. दूरदृष्टीच्या नेत्याकडे गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्रीपद असल्याने पोलीस दलात चांगल्या बदलासह नवीन बाबी देखील येणार हे निश्चित होते. त्यानुसार, सुऊवात देखील झाली. अवघ्या काही दिवसांत पोलीस दलात काही बदल करीत मुख्यमंत्र्यांनी मुंबईची धुरा देवेन भारतीसारख्या चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या हाती दिली. तर राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयात तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या योग्य त्या बदल्या करीत पोलीस दलाला अनोखी झळाळी देण्यास सुऊवात केली.
एवढेच नाही तर देशासह राज्यात सायबर फसवणूक, डिजिटल अॅरेस्ट अशा गुह्यांची संख्या वाढत चालल्याने, त्या अनुषंगाने योग्य ती नवीन यंत्रणा कार्यान्वीत येण्यास सुऊवात केली. एवढेच नाही मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चार नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली. तर सरत्या वर्षात राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त होत आहेत. यादरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे जरी चर्चेत असली तरी योग्य वेळेत मुख्यमंत्री मास्टरस्ट्रोक मारणार हे मात्र नक्की. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणी जरी आले तरी येणाऱ्या दिवसांत संबंधीत पोलीस महासंचालकाकडून राज्य पोलीस दलाला अच्छे दिन आणण्याची अपेक्षा असणार हे मात्र नक्की.
अशावेळी नवीन पोलीस महासंचालकाकडून सर्वात मोठी अपेक्षा असणार ती पोलीस दलाचे मनोबल वाढविण्याची. राज्यातील पोलीस दल 2011 नंतर आत्मविश्वास गमावून बसले आहे. यामुळे प्रथम पोलीस दलात आत्मविश्वास ठासून भरण्याची आवश्यकता आहे. त्यातच 26/11 हल्ल्याला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्याप्रकारे मुंबई पोलिसांकडे आधुनिक शस्त्रास्त्रs, अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. अगदी त्याप्रकारे राज्यातील इतर पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे अद्यापही या यंत्रणांचा अभाव आहे. ती सर्व यंत्रणा यांना प्रदान करण्यावर भर देण्याचे मोठे आव्हान येणाऱ्या पोलीस महासंचालकांवर असणार आहे.
राज्यात लोकसभा असो की विधानसभा निवडणुका किंवा महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका असोत डोळ्यात तेल घालून पोलीस दल आपले कर्तव्य बजावित आहेत. त्यातच दिल्ली बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या आणि बॉम्ब असल्याच्या अफवांना उत आला आहे. तरी देखील त्यातूनही अशा परिस्थितीमध्ये पोलीस दल अहोरात्र झटत आहे. राज्यातील एक दिवस असा नाही की मोर्चे, आंदोलने सुऊ नाहीत. हे सर्व करीत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडून पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सुऊ आहे. मात्र परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलीस दल सध्या अरे ला कारे करीत नाही. याची सर्व कल्पना सध्याच्या पोलीस महासंचालकांना आहे. यामुळेच 2026 वर्षात पोलीसांवरील हल्यांना आळा घालण्याबरोबरच यांचे मनोबल वाढविण्याचा संकल्प येणाऱ्या पोलीस महासंचालकांनी करावा.
2026 साली येणाऱ्या सर्व आव्हानांचा सकारात्मकतेच्या दृष्टीने विचार करीत, त्यांची पूर्तता करण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. या सर्वांची सुऊवात पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यापासून होणार आहे.
2011 साली आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारात पोलीस कर्मचाऱ्यांनी सपाटून मार खाल्ला होता. यावेळी अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्याने, संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खचले होते. त्यानंतर कोणीही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यावर हात उचलीत होता. यावेळी प्रतिकार करावा तरी समस्या, नाही करावा तरी समस्या अशी द्विधा मनस्थिती पोलिसांची झाली होती. संपूर्ण आत्मविश्वास गमाविलेल्या पोलिसांना पुन्हा उभारी देणे आवश्यक असल्याने, नवीन वर्षात राज्यात येणाऱ्या नवीन पोलीस महासंचालकांनी हा संकल्प प्रथम तडीस नेण्याचा निश्चय केला तर वावगे ठरणार नाही. त्याचप्रमाणे पोलीस दलांसाठी सर्वात मोठा संकल्प म्हणजे आधुनिकता.
पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रs आणि यंत्रणांसह सज्ज करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुऊ आहेत. मात्र अद्याप यामध्ये म्हणावे असे यश आले नाही. तसेच पूर्वीच्या काळी गुन्हेगारांवर राज्यातील पोलिसांचा जो दबदबा होता, तो दबदबा आता राहिलेला नाही. पूर्वी पोलिसांच्या गाडीचा सायरन देखील वाजला तरी गुन्हेगारांची पळता भुई थोडी व्हायची. मात्र सध्या एखादा गुन्हा करीत असताना, पोलिसांना पाहिले तरी तो गुन्हेगार आणखी चेकाळत हा गुन्हा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण सध्याचे गुन्हेगार हे निर्ढावलेले आहेत. यामुळे एखाद्या गुन्हेगाराला जरी पकडण्यासाठी गेले, तरी हे गुन्हेगार बेधडकपणे पोलिसांवर हात टाकत आहेत. अगदी काल-परवाची घटना कांदिवली येथे घडली आहे.
सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबियांनी हल्ला चढविला. तर काही ड्रग्ज तस्करांनी तर पोलिसांनाच टार्गेट केले आहे. या सर्वावर एकच उपाय पोलीस महासंचालकांनी करावा. शहरातील सर्व आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अनोख्या कार्यक्रमाची ऊपरेषा आखावी. त्याचप्रमाणे, तलवार अनेक दिवस म्यानात राहिली तर त्याला गंज चढतो. तसा गंज या पोलीस दलाला चढु नये, यासाठी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वारंवार मानसिक आणि शारीरिक परीक्षा
घेण्यात यावी. त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलीस दलाचे आरोग्य हे देखील महत्त्वाचे असून, त्यासाठी पोलीस महासंचालकांनी व्यायाम, योगा याबरोबरच आणखी नवीन उपक्रमांची आखणी करण्यात यावी. जेणेकऊन पोलीस दल सक्षम होईल. ज्यावेळेस पोलीस दल सक्षम होईल, तेव्हाच पोलीस दलात अच्छे दिनाची सुऊवात होईल.
अमोल राऊत