For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात आतापर्यत 68 इंच पाऊस

06:22 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात आतापर्यत 68 इंच पाऊस
Advertisement

पणजी /विशेष प्रतिनिधी

Advertisement

राज्यात सरासरी आतापर्यंत 68 इंच पाऊस पडला असला तरी अंजुणे धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 111.50 पाऊस पडला आहे. वाळपई आणि धारबांदोडा या दोन केंद्रामध्ये आतापर्यंत 96 इंच पावसाची नोंद झाली असून लवकरच इंचाची शंभरी पार करणार आहे.

गोव्यात मान्सून सक्रिय आहे. मात्र यंदाचा पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत अद्याप 31 टक्के कमीच आहे. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला. मडगाव, फोंडा, दाबोळी आणि काणकोण या केंद्रामध्ये अत्यल्प पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस वाळपईमध्ये दोन इंच पडला. धारबांदोडा व पेडणे येथे दीड इंच ,साखळी येथे एक इंच, केपे, सांगे, जुने गोवे, म्हापसा व पणजी येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. मुरगावमध्ये एक सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडला. गेल्या 24 तासातील पाऊस विचारात घेता सरासरी पाऊण इंच पावसाची नोंद झाली.

Advertisement

राज्यातील सर्व धरणे आता भरली आहेत. अंजुणे धरणामध्ये 91 मीटर पाणी असून धरण 90 टक्के भरलेले आहे. या दोन दिवसात धरणाची गेट खुली होईल असा अंदाज आहे. राज्यातील यंदाचा पाऊस हा सरासरीपेक्षा 31 टक्के जरी कमी असला तरी देखील तो समाधानकारक आहे. सांगे येथे आतापर्यंत 93 इंच पाऊस पडला. वाळपई व धारबांदोडा येथे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये इंचाचे शतक गाठले जाईल. केपे येथे 85 इंच पावसाची नोंद झालेली आहे. बुधवारी सकाळच्या दरम्यान सर्वत्र ऊन पडले होते, मात्र दुपारनंतर पावसाने सर्वत्र जोर धरला.

Advertisement
Tags :

.