For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

निवडणुकीचा आरंभबिंदू...

06:30 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीचा आरंभबिंदू

इम्प्रेशन’ असे आपण म्हणतो. त्यामुळे स्वाभाविकच निवडणुकीचा हा आरंभबिंदू अत्यंत महत्त्वाचाच असेल. पहिल्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांसह वेगवेगळ्या राज्यातील 102 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होईल. मुख्य म्हणजे पहिल्याच टप्प्यात सर्वाधिक मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे आयोगापुढेही ही निवडणूक यथास्थितपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी असेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेला सुऊवात झाली असून, अनेक उमेदवारांनी प्रचारालाही सुऊवात केल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणुका होतील. त्यात नागपूरसह रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर हे महत्त्वाचे मतदारसंघ असतील. राज्याच्या व देशाच्या राजकारणात नागपूरचे महत्त्व आगळे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच शहरात असून, देशातील मध्यवर्ती शहर म्हणून त्याची गणना होते. तसा नागपूर हा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, मागच्या दोन निवडणुकांपासून येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येते. गडकरी यांचे सर्वप्रिय व्यक्तिमत्त्व, विकासपुऊष ही प्रतिमा, कामाचा झपाटा आणि भाजपाचे मजबूत जाळे यामुळे त्यांचे पारडे जड दिसते. तरीही ही निवडणूक अगदीच एकतर्फी होऊ नये. येथून काँग्रेसने पश्चिम नागपूरचे आमदार व माजी महापौर विकास ठाकरे यांना उतरविले आहे. नागपुरात कुणबी समाजाची मते लक्षणीय आहेत. त्यात ठाकरे हे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांनाही जनाधार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात गडकरी यांचा प्रभाव लक्षात घेता विकास ठाकरे यांचा कस लागणार, हे नक्की. रामटेकची जागा शिंदे गटाच्या वाट्याची आहे. येथून विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना अर्धचंद्र देण्यात आला आहे. त्याऐवजी आमदार राजू पारवी हे निवडणुकीला सामोरे जातील. ठाकरे गटाने मात्र ही जागा काँग्रेसकरिता सोडली आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव असल्याने ते उमेदवार असू शकतात. तसे पूर्वापार या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, 1999 पासून येथून सेनेचा प्रभाव वाढत गेल्याचे इतिहास सांगतो. तुमाने यांच्याबद्दलची नाराजी व सेनेतील फूट पाहता येथून बर्वे कुटुंबीय आपला झेंडा फडकविण्याची आशा व्यक्त केली जाते. चंद्रपूरच्या लढतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष राहील. भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना येथून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसते. ती दूर करण्याचे आव्हान मुनगंटीवार यांच्यापुढे राहील. चंद्रपुरातून काँग्रेसने वरोरा येथील आमदार प्रतिमा धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. धानोरकर यांच्या निधनाची सहानुभूती त्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, केवळ त्यावर त्यांना विसंबून राहून चालणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे येथून मुलगी शिवानी हिला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने वडेट्टीवार कितपत सक्रिय राहतील, हे बघावे लागेल. महात्मा गांधी व विनोबा भावे आणि वर्ध्याचे नाते किती जवळचे होते, हे सर्वच जाणतात. एकेकाळी या मतदारसंघावर काँग्रेसचीच हुकूमत होती. परंतु, आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या वर्ध्यात पक्षाने पुन्हा रामदास तडस यांना रिंगणात उतरविले आहे. तर पवार गटाकडून माजी आमदार अमर काळे यांचे नाव चर्चेत आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपाच्याच प्रभावाखाली दिसतो. मात्र, विरोधी मतांचेही येथे मोठे पॉकेट्स आहे. हे विसरून चालणार नाही. भंडारा गोंदियात भाजपाने पुन्हा सुनील मेंढे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. त्यांच्यापुढे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांचे आव्हान असेल. या मतदारसंघात नाना पटोले यांचा प्रभाव आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांची भूमिकाही महत्त्वाची असेल. तर मेंढे यांच्याकरिता प्रफुल्ल पटेल यांची साथ निर्णायक ठरू शकते. गडचिरालीत अशोक नेते व माजी उपायुक्त नामदेव किरसान यांच्यात सरळ लढत होईल. वंचित आघाडीनेही रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर येथून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते व वंचित प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चेच्या फेऱ्या  सुरू होत्या. मात्र, आघाडीने पाच जागा देण्याची तयारी दर्शवूनही वंचितने अडेलतट्टूपणाची भूमिका घेणे, यातूनच काय तो अर्थबोध होतो. चर्चेमध्ये गुंतवत ठेवायचे नि सरतेशेवटी स्वबळाचा नारा देत प्रतिपक्षावर खापर फोडायचे, ही वंचितची जुनी खोड आहे. त्यामुळे वंचितसोबत आघाडी न होणे, यात आश्चर्यकारक काही नाही. वंचितचे राजकारण अनाकलनीय असले, तरी आता बहुतांशांना त्याचे बऱ्यापैकी आकलन होते. त्यामुळे पूर्वीसारखा त्यांचा लाख, दीड लाख मते घेण्याइतका प्रभाव राहील, असे असे समजू नये. एकूणच पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात पूर्व विदर्भात काँग्रेस व भाजपात काट्याची टक्कर होऊ शकते. यात कुणाची सरशी होणार, याबाबत औत्सुक्य असेल. याशिवाय अऊणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीकडेही देशाचे लक्ष राहणार आहे. येथे यापूर्वीच भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. येथे विधानसभेच्या 60 जागा असून, अंतिमत: कुणाची सत्ता येते, हेच आता पहायचे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.