स्टँड परिसर, नदीकाठ, मैदाने बनली नशेबाजीचे अड्डे
सांगली :
सांगलीत अलिकडे अल्पवयीन मुलांकडून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणावरुन चिडून खून करण्यापर्यंत मजल गेली आहे. शहरात नशेबाजीच्या गोळ्या, औषधे इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत असल्याने नशेबाज युवकांचे प्रमाण वाढत आहे. गल्ली-बोळात तरुण मुले रुमाल किंवा कपड्यावर औषधे टाकून ते हुंगताना दिसतात. त्यांना संस्काराच्या योग्य सुकाणूची गरज आहे.
शहरात नुकतेच मोबाईलला स्क्रीन बसवण्यावरुन खून करण्यात आला. तर दोन महिन्यामागे हरिपूर रोडला फक्त गाडी धडकण्यावरुन एका हॉटेल वेटरचा निर्घृण खून करण्यात आला. यात अल्पवयीनांचा समावेश आहे. किरकोळ कारणावरुन मुले खुनासारखा गंभीर गुन्हा करुन स्वत:सह कुटुंबालाही संकटात टाकत आहेत.
शहरातील नदी परिसरचा मोकळा भाग, स्टँड परिसर, स्मशानभूमी, मोकळी मैदाने, अंधाऱ्या जागा, काही कमर्शियल अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागा या नशेखोरांचे अड्डे बनत आहेत. गांजाच्या गोळया खाणे, सिगारेटी फुंकणे, रुमालावर किंवा कपड्यावर नशेचे औषध टाकून ते हुंगणे, असे सर्रास प्रकार आढळत आहेत. दिवसभर उनाडक्या, गाड्या फिरवणे, घरच्यांसह, दुकानदार किंवा रस्त्यांवर येणाऱ्या जाणाऱ्यांना दमदाटी करणे, असे उद्योग सुरु आहेत. यांच्यावर कोणतेच बंधन दिसून येत नाही.
नशेबाजांचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. सांगलीची आर्थिक पा†रस्थिती चांगली आहे, असेही नाही. यामुळे अनेकांना रोजगाराच्या शोधात इतरत्र जावे लागत असल्याने वाईट सवयींना बळी पडतात. तसेच सामा†जक पा†रस्थिती चांगली नसल्याने अनेक युवक नशेबाजीकडे वळलेले दिसतात. नवपिढीला ा†शक्षणाची सा†वधा पुरवल्यास युवक वां†चत राहणार नाहीत, रोजगाराच्या संधी पुरवणे आवश्यक आहे. सामा†जक जागरूकता ा†नर्माण करणे, समपुदेशन करणे, युवापिढीचा माना†सक ताण कमी करणे आवश्यक आहे. शाळेतूनच नशेबाजी ा†वरोधी कार्यक्रम आया†जत करणे आवश्यक आहे.
आक्रमतेच्या तळाशी भिती असल्याने वाढती हिंसा
मुलांच्या मनात राग असतो, त्यामुळे ते आक्रमक होतात. कारण त्यांच्या मनात असुरक्षेची भिती असते. लहानपणापासून ती दडलेली असते. त्यांनी ती परिस्थिती अनुभवलेली असते. कुटुंबातही वाद पाहिल्याने चिडचिड होते. परिस्थिती, जैविक कारणे, अपघात, गरिबी, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारीमुळे हे प्रमाण जास्त आहे. टेस्टोटेरॉन वाढल्यानेही मुले गंभीर होतात व हिंसेला जन्म देतात. त्यांना चुक-बरोबर कळत नाही. त्यामुळे तरुणाईकडे सजगपणे पाहणे सध्या गरजेचे आहे. - अश्विनी कुलकर्णी, मानसतज्ञ